मोठी बातमी! शरद पवारांना सर्वात मोठा हादरा, निष्ठावंत नेत्याने साथ सोडली, मतदानाच्या एकदिवस आधीच मोठा झटका

राज्यात उद्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, त्यापूर्वीच आज राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निष्ठावंत नेत्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ सोडली आहे.

मोठी बातमी! शरद पवारांना सर्वात मोठा हादरा, निष्ठावंत नेत्याने साथ सोडली, मतदानाच्या एकदिवस आधीच मोठा झटका
शरद पवार
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
Ajay Deshpande | Updated on: Jan 14, 2026 | 3:28 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. मंगळवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. उद्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान आहे, तर शुक्रवारी निवडणुकीचा निकाल आहे. दरम्यान महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचं पहायला मिळालं, ज्यांना तिकीट मिळालं नाही, अशा अनेक नाराजांनी आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये देखील हेच चित्र पहायला मिळालं होतं. अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी आपला पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केला. दरम्यान या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे, त्याच्या एक दिवस आधीच बड्या नेत्यानं पक्षाचा राजीनामा दिला आहे.

शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडली आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा राजीनामा दिला आहे. हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  रमेश कदम यांचा चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाला होता, त्यानंतर त्यांनी आता आपला राजीनामा दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रमेश कदम हे नाराज होते. पक्षात योग्य स्थान आणि सहकार्य न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. रमेश कदम हे 1984 पासून राष्ट्रवादीमध्ये होते, अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीमधील अनेक बड्या नेत्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला, मात्र रमेश कदम यांनी शरद पवार यांची साथ सोडली नव्हती.

दरम्यान मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे, येत्या पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान जिल्हा परिषद आणि नगर पंचायत निवडणुका जाहीर होताच रमेश कदम यांनी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.