अखेर नाराज एकनाथ शिंदेंचा भाजपला मोठा धक्का, शिवसेनेकडून मोठी घोषणा, विधान परिषद निवडणुकांपूर्वीच घडामोडींना वेग

सध्या राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकांचं वारं वाहत आहे. एकूण पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र आता त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

अखेर नाराज एकनाथ शिंदेंचा भाजपला मोठा धक्का, शिवसेनेकडून मोठी घोषणा, विधान परिषद निवडणुकांपूर्वीच घडामोडींना वेग
eknath shinde
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 16, 2026 | 7:55 PM

सध्या राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकांचं वारं वाहत आहे. एकूण पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. ज्यामध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे. पुणे शिक्षक मतदार संघाच्या जागेसाठी सुरुवातीपासूनच भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरु असल्याचं पहायला मिळालं. या जागेसाठी दोन्ही पक्षाच्यां नेत्यांकडून सारखा दावा करण्यात येत होता. मात्र शेवटी पुणे शिक्षक मतदारसंघांची जागा भाजपच्या वाट्याला गेली. दरम्यान आता या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून पुणे शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी मंगेश चिवटे हे इच्छूक होते. परंतु ऐनवेळी हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आला. या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराने आपला अर्ज देखील दाखल केला. मात्र जरी ही जागा भाजपला सुटली असली तरी देखील या मतदारसंघातून मंगेश चिवटे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची देखील चर्चा सुरू झाली. मात्र भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा फेटाळून लावण्यात आल्या होत्या.

Loading...

दरम्यान याच मतदारसंघातून आणखी एक उमेदवार सचिन सानप यांनी देखील आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सचिन सानप हे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीये मानले जातात. त्यामुळे आता शिवसेनेकडून पुणे शिक्षक मतदार संघात विधान परिषद निवडणुकीसाठी सचिन सानप हे शिवसेना पक्षाचे पुरस्कृत उमेदवार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या बाबतचं पत्रक देखील जारी करण्यात आलं आहे.  या मतदारसंघात आता हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना शिंदे गटाच्या या निर्णयामुळे आता भाजपाच्या उमेदवाराचं टेन्शन वाढलं आहे.  शिवसेना शिंदे गटाने घेतलेल्या या भुमिकेमुळे या मतदारसंघात आता मोठी चुरस पहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us