AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता मंत्र्यांसाठी आयपॅडची खरेदी

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळासाठी अ‍ॅपलच्या आयपॅडची खरेदी करण्यात आली आहे, ई कॅबेनेटसाठी सरकारे हा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता मंत्र्यांसाठी आयपॅडची खरेदी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 05, 2025 | 9:47 AM
Share

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळासाठी अ‍ॅपलच्या आयपॅडची खरेदी करण्यात आली आहे, ई कॅबेनेटसाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारकडून अ‍ॅपलच्या आयपॅडसह मॅजिक कीबोर्ड, अ‍ॅपलची पेन्सिल आणि कव्हरची देखील खरेदी करण्यात आली आहे. एका आय पॅडच्या खरेदीसाठी 1 लाख 65 हजार 843 रुपयांचा खर्च आहे, तसेच प्रति मॅजिक किबोर्डसाठी 31 हजार 188 रुपयांची तरदूत करण्यात आली आहे, 7 हजार 268 रुपये अ‍ॅपल पेन्सिलसाठी आणि 8 हजार 850 रुपये कव्हरची किंमत आहे. हे सर्व साहित्य खरेदीसाठी सरकारकडून एकूण 1 कोटी 6 लाख 57 हजार 583 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सरकारकडून संबंधित कंपनीला 50 आयपॅड, 50 कीबोर्ड, 50 पेन्सिल आणि 50 कव्हरची ऑर्डर देण्यात आली आहे, तसेच हे सर्व साहित्य एका आठवड्याच्या आत देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

राज्य सरकारने या वस्तू खरेदीच्या  पार्श्वभूमीवर काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार  ई -कॅबिनेटच्या पार्श्वभूमीवर आयपॅड आणि इतर साहित्य खरेदीची ई-निविदा 9 एप्रिल 2025 मध्ये काढण्यात आली होती. मात्र तांत्रिक निविदा छाननीमध्ये एकही निविदाकार पात्र न ठरल्यामुळे 15 दिवसांच्या कालावधीनंतर 13 मे 2025 रोजी पुन्हा एकदा निविदा काढण्यात आली. या संदर्भातील जाहिरात वर्तमान पत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच शासनाच्या संकेत स्थळावरही देण्यात आली होती. दिलेल्या जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या निविदांची तांत्रिक व व्यावसायिक छाननी केल्यानंतर रेडियस सिस्टीम या सेवा पुरवठादार कंपनीचा प्रस्ताव स्विकारण्यात आला आहे, या कंपनीला एका आठवड्याच्या आत सर्व साहित्य पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारकडून ई कॅबिनेटसाठी  50 आयपॅड, 50 कीबोर्ड, 50 पेन्सिल आणि 50 कव्हरची खरेदी करण्यात आली आहे.  हे सर्व साहित्य एका आठवड्याच्या आत देण्याचे आदेश देखील संबंधित कंपनीला देण्यात आले आहेत. हे सर्व साहित्य खरेदीसाठी सरकारकडून एकूण 1 कोटी 6 लाख 57 हजार 583 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच हे सर्व साहित्य वेळेत देण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत. यासोबतच अनेक अटी देखील घालण्यात आल्या आहेत.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...