मोठी बातमी! हायकोर्ट लिपीक पदाचा पेपर लीक? अभिजीत दिपकेंच्या थेट आरोपाने एकच खळबळ, आंदोलनाने पुन्हा वातावरण तापणार?

High Court clerk typing exam paper leaked: मुंबई हायकोर्टातील लिपिक पदाच्या भरतीसाठी आज घेण्यात आलेली टायपिंग परीक्षा फुटल्याचा मोठा दावा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या देशात सरकार परीक्षा घेऊ शकत नाही, असे म्हणत दिपके यांनी सरकारची अक्कल काढली. तर प्रश्न सुटेपर्यंत मागे हटू नका, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

मोठी बातमी! हायकोर्ट लिपीक पदाचा पेपर लीक? अभिजीत दिपकेंच्या थेट आरोपाने एकच खळबळ, आंदोलनाने पुन्हा वातावरण तापणार?
हायकोर्ट लिपीक पदाचा पेपर लीक? अभिजीत दिपकेंचा थेट आरोप
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 16, 2026 | 6:19 PM

High Court clerk typing exam paper leaked: देशात UG -NEET पेरपफुटीनंतर TET आणि आता मुंबई हायकोर्टातील लिपिक पदाची परीक्षाही फुटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी हा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. खराब की बोर्ड, बिघडलेले संगणक, परीक्षा व्यवस्थेचा उडालेला बोजावार आज उभ्या महाराष्ट्राने पाहिला. परीक्षेतील ही अव्यवस्था समोर आल्यानंतरही आयोजकांनी विद्यार्थ्यांचीच अक्कल काढल्याचा आरोप करत दिपके यांनी सरकारचे फुटपट्टीने माफ काढले. त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. आज संपूर्ण राज्यातच या परीक्षेतील गोंधळ समोर आल्याने संतापाची लाट उसळली आहे. न्यायालयीन परीक्षेत तरी अशी चूक होणे अपेक्षित नसल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.

परीक्षा झाल्यावर काही विद्यार्थी परीक्षा केंद्रात कसे?

मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी आक्रमक झालेत नांदेड शहरातील छत्रपती चौकातील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ येथे परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ऑनलाइन परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या भौतिक सोयी सुविधाचा अभाव असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. परीक्षेचा सॉफ्टवेअर स्लो आहे, कीबोर्ड नादुरुस्त होते, जुने संगणक होते,स्क्रिन साईज छोटी होत्या असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

परीक्षा परत आयोजित करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झालेत. परीक्षा झाल्यानंतर गेटला लॉक लाऊन काही विद्यार्थी सेंटर मध्येच का बसवून ठेवले? असा थेट सवाल आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. त्यांची वेगळी परीक्षा तर घेतली नाही ना असा आरोप करीत विद्यार्थी आक्रमक झाले होते.नियंत्रणासाठी असलेल्या परीक्षा नियंत्रकांवरही विद्यार्थ्यांनी यावेळी गंभीर आरोप करीत त्यांना धारेवर धरले. त्यानंतर आता अभिजीत दिपके यांनी ही परीक्षा फुटल्याचा गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्रश्न सुटेपर्यंत मागे हटू नका

छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्ट क्लर्क टायपिंग परीक्षेतील सावळा गोंधळ समोर आला. की बार्ड खराब होता. तर काहींचे संगणक चालत नव्हते. काहींची बसण्याची व्यवस्था ठीक नव्हती, अशा अनेक समस्या आणि अडचणी होत्या. यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा पुन्हा घेण्यासाठी आंदोलनाची हाक दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. त्यांनी एकच गोंधळ केला. त्यांनी आयोजकांवर मोठे आरोप केले. त्यांच्या या आंदोलनाला अभिजीत दिपके यांचे बळ मिळाले. त्यांनी या मुद्यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले.

कल्याण मधून हायकोर्ट टायपिंग ची परीक्षा दिलेल्या उमेदवाराचा अभिजीत दिपके यांना फोन आला. री एक्झाम झाल्याशिवाय तुम्ही तिथून हलू नका आम्ही सुद्धा इथे बसून राहणार आहे असे आश्वासन दिपके यांनी त्यांना दिले. प्रश्न सुटेपर्यंत मागे हटू नका असे आवाहन अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉलवरून केले. त्यानंतर आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी जाहीर केली.

सकाळपासून हायकोर्ट भरती परीक्षेतील गोंधळाविरोधात कल्याणमध्ये विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. परीक्षा केंद्रावरील सर्व्हर, संगणक आणि तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी अभिजीत दिपके यांनी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधला. जोपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत मागे हटायचं नाही, असा स्पष्ट संदेश दिपकेंनी विद्यार्थ्यांना दिला. दिपकेंच्या व्हिडिओ कॉलनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका जाहीर केली. प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, परीक्षा पारदर्शक पद्धतीने घ्यावी अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us