AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कीबोर्ड खराब, संगणक बंद, हायकोर्ट परीक्षेत महागोंधळ, अभिजित दीपकेंनी सरकारची अक्कल काढली; संभाजीनगरात वातावरण तापलं!

Abhijeet Dipke High Court typing exam : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत तांत्रिक अडचणीवरून एकच गोंधळ उडाला आहे. कीबोर्ड खराब होते. संगणक खराब होते. ऑनलाईन परीक्षा घेण्याची लायकी नसेल तर परीक्षा घेता कशाला असा सणसणीत टोला सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी लगावला. जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत आंदोलन बंद होणार नाही असा इशारा दिपके यांनी दिला.

कीबोर्ड खराब, संगणक बंद, हायकोर्ट परीक्षेत महागोंधळ, अभिजित दीपकेंनी सरकारची अक्कल काढली; संभाजीनगरात वातावरण तापलं!
अभिजीत दिपके, हायकोर्ट टायपिंग परीक्षा गोंधळImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 16, 2026 | 5:36 PM
Share

Abhijeet Dipke High Court typing exam : मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी टायपिंग परीक्षेच मोठा गोंधळ उडाला. की बोर्ड खराब होता. संगणक नादुरुस्त होते. परीक्षा केंद्रावरील बोजावारा यानिमित्ताने समोर आला. इतक्या तांत्रिक अडचणी आल्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले. त्यांनी न्यायालयाच्या प्रांगणातच आंदोलन सुरू केले. ही माहिती मिळताच, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी तातडीने तिथे धाव घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. कीबोर्ड खराब होते. संगणक खराब होते. ऑनलाईन परीक्षा घेण्याची लायकी नसेल तर परीक्षा घेता कशाला असा सणसणीत टोला सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी लगावला. त्यांनी सरकारची अक्कल काढली. जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत आंदोलन बंद होणार नाही असा इशारा दिपके यांनी दिला.

संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांचा संताप

मुंबई हायकोर्टाच्या टायपिंग आणि स्टेनोच्या पेपर मध्ये गोंधळ उडाला. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध शहरातील परीक्षा केंद्रांवर या परीक्षेतील अराजकता आणि असुविधा उघड झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांचा पार चढला. त्यातच परीक्षा आयोजकांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून न घेता, त्यांनाच अयोग्य भाषा वापरल्याने आक्रोश दिसून आला. जोपर्यंत न्यायाधीश समोर येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा, ठिय्या देण्याचा निर्धार अभिजीत दिपके यांनी व्यक्त केला.

आज परीक्षा देताना सर्वर मध्ये बिघाड अनेक विद्यार्थ्यांचे लॉगिन सुद्धा झाले नाही. सरावासाठी दिलेले कीबोर्ड यामध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड होते त्यामुळे व्यवस्थित सराव सुद्धा होऊ शकला नाही व वेळ निघून गेला. दहा वाजता एक्साम सेंटरच्या आत गेलेले विद्यार्थी तीन वाजेपर्यंत बाहेर आले नाही त्यामुळे सेकंड बॅचचे विद्यार्थी हे सेंटर बाहेरच उभे राहिले. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आलेले आहेत. अधिकृत संकेतस्थळावर कोणतीही सूचना न देता शेवटच्या क्षणी परीक्षा ही स्क्रीन टू स्क्रीन होणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.

नांदेडमध्ये मोठा गोंधळ

हायकोर्ट लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत तांत्रिक अडचण आली. नांदेड शहरातील छत्रपती चौकातील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ येथे परीक्षा होती. ऑनलाइन परीक्षेत भौतिक सोयी सुविधांचा अभाव दिसून आला. परीक्षेच सॉफ्टवेअर स्लो, कीबोर्ड नादुरुस्त, स्क्रिन साईज छोटी असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप होता. परीक्षा परत आयोजित करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक दिसले. वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी परीक्षेला आले आहेत. परीक्षा घेणारे शिक्षक प्रशिक्षित नसल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला. तांत्रिक अडचणींमुळे 99% विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेत नापास झाल्याचा विद्यार्थ्यांनी माहिती दिली. आक्रमक विद्यार्थ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

हायकोर्ट भरती परीक्षेचा बोजवारा!

मुंबई हायकोर्टातील लिपिक पदाच्या भरतीसाठी सुरू असलेल्या टायपिंग टेस्टमध्ये आज कल्याण पश्चिमेतील एपीएमसी मार्केट परिसरात मोठा गोंधळ उडाला. संगणक आणि कीबोर्डमधील बिघाड, सर्व्हर डाऊन, तसेच नियोजनाच्या अभावामुळे शेकडो विद्यार्थ्यांना तासन्‌तास खोळंबून राहावे लागले. संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेरच ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.

कल्याणच्या एपीएमसी मार्केट परिसरातील परीक्षा केंद्रावर मुंबई हायकोर्टाच्या लिपिक भरतीसाठी टायपिंग टेस्ट आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो विद्यार्थी या परीक्षेसाठी येथे दाखल झाले होते.मात्र परीक्षा केंद्रावर बसण्याचे नियोजन नसल्याचा, संगणक धुळखात पडलेले असल्याचा आणि अनेक संगणक सुरूच होत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यातच सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत झाली.सकाळी दहा वाजताच्या सत्रातील उमेदवारांसह पुढील सत्रातील विद्यार्थ्यांनाही तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घालत निषेध नोंदवला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, संस्थेचे संचालक संजय वानखेडे यांनी तांत्रिक अडचणीमुळे प्रिंट प्रक्रिया उशिराने होत असल्याचे सांगत समस्या सोडविण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट केले.

अभिजीत दिपके सरकारवर कडाडले

सिस्टीममध्ये बसलेल्या लोकांनी विद्यार्थ्यांची अक्कल काढली. यांनी अगोदरच व्यवस्था का करून ठेवली नाही? असा रोकडा सवाल अभिजीत दिपके यांनी विचारला. विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की त्यांची परीक्षा होती. आज इथे हायकोर्टाची परीक्षा होती. या परीक्षेसाठी लोक बीड, आंबेजोगाई अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आले होते. परीक्षेला आल्यावर त्यांना समजलं की कॉम्यूटर चांगले काम करत नाहीयेत. स्क्रीन काम करत नाहीये, कीबोर्ड काम करत नाहीये, असं या मुलांना समजलं. दहा मिनिटाच्या आत सगळेच विद्यार्थी परीक्षेतूून लॉगाऊट झाले. सगळ्याच विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले. विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले नाहीत. सिस्टीम नापास झाली आहे. विद्यार्थी दुरून येत आहेत. परीक्षा कशी द्यायची, हे तुम्हाला माहिती नाही का? तुम्हाला अक्कल नाही का? असं विद्यार्थ्यांना बोललं जातंय. परीक्षा घेणाऱ्यांना कीबोर्ड चांगले लावायची अक्कल नव्हती का. सरकारलाच अक्कल नाही. जोपर्यंत री एक्झाम व्हायला पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. जोपर्यंत जिल्हा न्यायाधीश लेखी लिहून देत नाहीत, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र