AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील प्रकरणात मोठं ट्विस्ट, अजितदादांकडून आता नवी माहिती

केलेल्या कामाच्या बिलाचे पैसे न मिळाल्यानं कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. सरकारकडून बिल निघत नसल्यानं ते आर्थिक अडचणीत सापडले होते, मात्र या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे.

कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील प्रकरणात मोठं ट्विस्ट, अजितदादांकडून आता नवी माहिती
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 24, 2025 | 3:07 PM
Share

केलेल्या कामाच्या बिलाचे पैसे न मिळाल्यानं कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. सरकारकडून बिल निघत नसल्यानं ते आर्थिक अडचणीत सापडले होते, आणि त्यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती समोर आली आहे, या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे, मात्र आता या घटनेबाबत नवी माहिती समोर आली आहे, याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार यांनी माहिती दिली.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

आज सकाळी दहा वाजता एक बैठक झाली, या बैठकीला चीफ सेक्रेटरी उपस्थित होते. आम्ही सगळे जण उपस्थित होतो. प्लॅनिंग, फायनान्स सर्वच विभागातले प्रमुख अधिकारी उपस्थित होते, आता मी सर्वांचे नाव घेत नाही. त्यावेळेसच मी सर्व माहिती घेतली. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार हे  कंत्राट एका दुसऱ्या कंत्राटदाराला दिलं होतं, त्याने सब कॉन्ट्रॅक्टर नेमला आहे. आमचा संबंध येते तो मुख्य कॉन्ट्रॅक्टरशी, उद्या तुम्ही कंत्राटदार म्हणून काम घेतलं आणि आम्ही तुम्हाला काम दिलं. तुमचे बिल येतील तसे आम्ही पैसे देऊ, समजा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सब कंत्राटदार नेमलं असेल, तर सब कंत्राटदाराला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाहीये, अधिकार तुमचा आहे.

आता तुमचं आणि त्यांचं काय झालं? त्याची आम्हाला माहिती नाहीये, बऱ्याचवेळेला काय होत, की तुम्ही लगेचच ब्रेकिंग न्यूज सुरू करता. तो तुमचा अधिकार आहे, मात्र दुसरी बाजू देखील मीडियानं दाखवली पाहिजे, मी तिथे विचारलं जीवन प्राधिकरणामध्ये कोण कंत्राटदार आहे? जल जीवन ही जी योजना आहे, ती केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेत 50 टक्के निधी हा केंद्राचा तर 50 टक्के निधी हा राज्याचा असतो. त्यांचा निधी येईल तसे आपण तिथे अधिकचे पैसे देतो, कधी आपल्या निधीमधून देखील देतो. त्यामुळे आम्ही त्यांना काय थेट कंत्राट दिलेलं नव्हतं, तरी पण एखाद्या व्यक्तीचा जीव जाणं, किंवा त्याने स्वत: आत्महत्या करणं, यामागे नेमकी काय कारणं आहेत? याचा तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा