AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सक्षमच्या मृतदेहासोबत लग्न, त्याच्याच भावावर गंभीर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, ते मेसेज समोर येताच मोठी खळबळ

काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली होती. सक्षम ताटे नावाच्या तरुणाची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे.

सक्षमच्या मृतदेहासोबत लग्न, त्याच्याच भावावर गंभीर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, ते मेसेज समोर येताच मोठी खळबळ
Aanchal MamidwarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 15, 2026 | 7:10 PM
Share

काही दिवसांपूर्वी नांदेडमधून एक हादरवणारी घटना समोर आली होती, आंचल मामीडवार या तरुणीच्या प्रियकरावर तिच्याच वडिलांनी आणि भावाने गोळ्या झाडल्या होत्या, या घटनेत आंचल मामीडवार या तरुणीचा प्रियकर असलेला सक्षम ताटे नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. हे प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजलं. या प्रकरणात आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यावेळी आंचल मामीडवारने केली होती. तसेच तिने सक्षमच्या मृतदेहासोबत लग्न देखील केलं होतं. आता आपण कायम सक्षमच्याच घरी राहणार, असंही तिने त्यावेळी म्हटलं होतं. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हळहळलं होतं. परंतु आता आयुष्यभर सक्षमच्याच घरी राहणार असं म्हणणाऱ्या आंचल मामीडवारने त्याचं घर सोडलं आहे. ती आता आपल्या आजीसोबत राहत आहे.

दरम्यान आता आंचल मामीडवारने सक्षम ताटेचं घर सोडल्यानं याची चांगलीच चर्चा सुरू आहे. याबाबत तिला विचारलं असता, तिने धक्कादायक दावा केला आहे. तिने सक्षमच्या लाहान भावावर गंभीर आरोप केला आहे. तो आपल्यासोबत चुकीचं वागत होता, त्याने अनेकदा मला चुकीचा स्पर्श केला असा आरोप आंचलने केला आहे. दरम्यान मी याची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना देखील दिली, परंतु त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, म्हणून आपलं त्याचं घर सोडलं असं आंचलने म्हटलं आहे.

परंतु या प्रकरणात आता नवं ट्विस्ट आलं आहे. आंचलने सक्षमच्या लहान भावावर आरोप केल्यानंतर आता सक्षमच्या आत्या आणि आईने मोबाईलमधील काही संदेश दाखवून मोठा दावा केला आहे, त्या एका वृत्तवाहिनीसोबत बोलत होत्या. आता आमचं एकच लेकरू आहे, मी तिला हात जोडून विनंती करते की आता आमच्या मुलाला बदनाम करू नको. त्याने तुला काहीही केलं नाहिये. तो सारखा तुला वहिनी वहिनी करायचा, असं सक्षमच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी सक्षमच्या आत्याने आंचलचे काही मेसेज देखील प्रसारमाध्यमांना दाखवले आहेत, ज्यामध्ये आंचल सक्षम ताटेच्या भावाला ‘बोल की बाळा’ असं म्हणत आहे. तसेच तिचे इतरही काही मेसेज समोर आले आहेत, यावरून सक्षण ताटेचा भाऊ आणि आंचलमध्ये संवाद सुरू होता, असं दिसून येत आहे.

Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले