भोंदू अशोक खरात प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट मुलाला… पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्या!
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धनला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता मुलाचीही कसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. यातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धनला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता मुलाचीही कसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. यातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांनी आज अशोक खरातच्या घरी धाड टाकली. एका जमीन व्यवहार प्रकरणात अशोक खरातच्या पत्नीला अटक करण्यासाठी पोलिस घरी पोहोचले होते, मात्र यावेळी पोलिसांनी अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला ताब्यात घेतले आहे.
अशोक खरातचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात
अशोक खरातच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेत महाराष्ट्र पोलीस अकादमी या ठिकाणी आणले आहे. याच ठिकाणी भोंदू अशोक खरात याची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. भोंदू अशोक खरात याची पत्नी कल्पना खरातवर देखील गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता कल्पना खरात यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. मात्र अटकेच्या भीतीने कल्पना फरार झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पोलिस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.
पुण्यात मुलीच्या नावावर मालमत्ता
एसआयटीच्या तपासात भोंदू अशोक खरातने कोट्यवधींची संपत्ती कमवल्याची माहिती समोर आली आहे. ताज्या माहितीनुसार, अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यातील मॉडेल कॉलनीत आलिशान इमारतीत 3 बीएचके फ्लॅट आहे. 24 रत्नम नावाच्या आलिशान सोसायटीत सातव्या मजल्यावर 1055 चौरस फुटांचा हा आलिशान फ्लॅट आहे. हे घर 13 सप्टेंबर 2023 रोजी खरेदी करण्यात आलेले आहे. खरातने संबंधित बिल्डरला 1 कोटी 20 लाख रूपये रोख स्वरूपात दिल्याची माहिती समोर आली आहे. इतरही आणखी काही शहरांमध्ये खरातची मालमत्ता आहे.
अशोक खरातची कसून चौकशी सुरू
दरम्यान, अशोक खरातला महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. गेल्या 10-12 दिवसांपासून त्याची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. खरात हा महिलांना कसं जाळ्यात ओढायला आणि त्यांचे कसे शोषण करायचा याबाबत महत्त्वाची माहिती एसआयटीच्या हाती लागली आहे. तसेच भोंदू अशोक खरातचे अनेक राजकारण्यांशीही संबंध होते असंही समोर आलं आहे.