AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अशोक खरातची बायको फरार? गुन्हा दाखल होताच…पोलीस घरी पोहोचताच…

अशोक खरातच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. आता अशोक खरातची पत्नी कल्पना खरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांच्या मागावर असून त्या फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मोठी बातमी! अशोक खरातची बायको फरार? गुन्हा दाखल होताच...पोलीस घरी पोहोचताच...
ashok kharatImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 31, 2026 | 7:49 PM
Share

Kalpana Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणात रोजच नवनवीन खुलासे होत आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांसोबतच अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे. त्याच्याविरोधात 10 गुन्हे दाखल झाले आहेत. शिर्डी जमीन खरेदीतील कथित फसवणूक प्रकरणातही खरात याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजेच खरात याच्यासह त्याची कल्पना खरात यांनादेखील आरोपी करण्यात आले आहे. म्हणूनच अशोक खरात याच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता कायद्याने आपला फास आवळण्यास सुरुवात केल्यानंतर आता मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कल्पना खरात झाल्या फरार

सूत्रांच्या माहितीनुसार अशोक खरातची पत्नी कल्पना खरात या फरार झाल्या आहेत. शिर्डी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या फरार झाल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिर्डी पोलीस हे कल्पना खरात यांच्या मागावर आहेत. त्यांच्या अटकेसाठी दोन पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेनं रवाना झाली आहेत. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता कल्पना खरात या फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुण्यात आलिशान इमारतीत तीन बिएचके फ्लॅट

दुसरीकडे अशोक खरात याच्या मुलीबाबतही मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यातील मॉडेल कॉलनीतील आलिशान इमारतीत 3 बीएचके फ्लॅट आहे. 24 रत्नम नावाच्या आलिशान सोसायटीत सातव्या मजल्यावर 1055 चौरस फुटांचा हा आलिशान फ्लॅट आहे. 13 सप्टेंबर 2023 रोजी हा फ्लॅट खरेदी करण्यात आला होता.

1 कोटी 20 लाख रोख स्वरुपात दिले

मिळालेल्या माहितीनुसार या फ्लॅटसाठी खरातने संबंधित बिल्डरला 1 कोटी 20 लाख रूपये रोख स्वरूपात दिले होते. सेल डीडमध्ये चेकने व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाहीये. राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये खरातची स्थावर मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीत त्याचे घर असल्याने आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...