LIVE: भाजप नेत्यांचा सिद्धिविनायक मंदिरात घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

आज सकाळपासूनच पुणे, शिर्डी, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

LIVE: भाजप नेत्यांचा सिद्धिविनायक मंदिरात घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 2:31 PM

मुंबई: राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच पुणे, शिर्डी, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. शिर्डीत भाजपच्या अध्यात्मिक समन्वय समितीकडून आंदोलन करण्यात आले. याठिकाणी धर्मगुरू आणि आचार्यांकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आले . तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फलकबाजीही करण्यात आली. ‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’, असा मजकूर या फलकांवर लिहण्यात आला होता. (BJP agitation for Temple opening )

[svt-event title=”‘हिंदुत्त्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही'” date=”13/10/2020,12:29PM” class=”svt-cd-green” ] राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहण्यात आले होते. यामध्ये त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. या पत्राला मुख्यमंत्र्यांकडूनही चोख भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले. आमच्या हिंदुत्त्वाला कोणीही प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. आम्हाला कोणाकडून शिकण्याचीही गरज नाही, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. [/svt-event]

[svt-event title=”पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांची धरपकड” date=”13/10/2020,12:22PM” class=”svt-cd-green” ] भाजपच्या नेत्यांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. आम्हाला मंदिरात प्रवेश दिला नाही तर मंदिराच्या गाभाऱ्यात जाणार आणि परमेश्वरालाच साकडे घालणार. आम्ही मंदिरात प्रवेश करणारच, अशी आक्रमक भूमिका प्रवीण दरेकर यांनी घेतली होती. मात्र, या सर्वांनी मंदिरात शिरायचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन गाडीत कोंबले. यानंतर प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. भीती दाखवून आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला. ही लोकशाही नाही, ही हुकूमशाही आहे, असेही दरेकर यांनी म्हटले. [/svt-event]

[svt-event title=”भाजपच्या नेत्यांकडून सिद्धिविनायक मंदिरात घुसण्याचा प्रयत्न” date=”13/10/2020,12:14PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सिद्धिवनायक मंदिरांत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या सर्वांना रोखले. तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावरच गणपतीची आरती करण्यात आली. [/svt-event]

मुंबईत सिद्धीविनायक मंदिराच्याबाहेर भाजपकडून लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्रात वाईन शॉप आणि बार सुरु होतात. मात्र, आमचे श्रद्धास्थान असलेल्या आणि आमचे मन शांत होईल, अशी मंदिरे उघडण्यास सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. मुख्यमंत्री सोईने स्वत:ची जबाबदारी जनतेवर ढकलत आहेत.

एकीकडे शेतकऱ्याचा भाजीपाला घरपोच करता येणे शक्य नाही. मात्र, सरकार बार सुरु करते. त्यामुळे हे सरकार नेमके कुठे चाललेय, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. मंदिरांना हवं तर रेस्टॉरंट आणि जिमसारखे नियम लावा. पण मंदिरे उघडाच अशी मागणीही दरेकर यांनी केली. मंदिरांवर अनेक लोकांचा रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे मंदिरे सुरु झाली नाही तर लोक कोरोनाऐवजी उपासमारीने मरतील, असेही दरेकर यांनी सांगितले.

17 मार्च पासून मंदिर बंद असल्याने शिर्डीतील अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. दरोरोज करोडो रुपयांची उलाढाल शिर्डीत होत असते. तर देश विदेशातून भाविक साईंच्या दर्शनाला येत असतात. शिर्डीत मोठ्या प्रमाणात हॉटेल, हारफुलें, प्रसाद, मूर्त्यांची विक्रीचा व्यवसाय केला जातो. तसेच अनेक छोटे मोठे व्यवसाय हे मंदिरावर अवलंबून आहेत. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे मंदिर उघडण्याच्या मागणीने शिर्डीत जोर धरला आहे.

तर पुण्यात तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन झाले. झोपी गेलेल्या या कुंभकर्ण रुपी सरकारला जागे करणारे प्रतीकात्मक आंदोलन पुणे शहर भाजप करेल. कुंभकर्णाची प्रतिकात्मक प्रतिमा तयार करण्यात येणार आहे. घंटानाद, शंखनाद, भजन, तुतारी अशी पारंपरिक वाद्य वाजवून या आधुनिक कुंभकर्णाला जागे करु, असे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घाईघाईत घेणार नाही; मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा मंत्र!

भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना धार्मिकस्थळं उघडण्याचा सल्ला द्यावा; अस्लम शेख यांनी सुनावलं

मंदिर बंद उघडे बार ,उद्धवा अजब तुझे सरकार, भाजपच्या आंदोलनाची टॅगलाईन

(BJP agitation for Temple opening )

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.