AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ‘वर्षा’वर भाजपची बैठक, राजकारणात घडामोडींना वेग, बड्या नेत्यांची उपस्थिती

मोठी बातमी समोर येत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. 

मोठी बातमी! 'वर्षा'वर भाजपची बैठक, राजकारणात घडामोडींना वेग, बड्या नेत्यांची उपस्थिती
devendra fadnavisImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 13, 2026 | 9:35 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश देखील उपस्थित राहणार आहेत.  या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे आणि खासदार अशोक चव्हाण देखील बैठकीला उपस्थिती राहणार आहेत. केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तार, राज्यातील प्रलंबित संघटनात्मक नियुक्त्या आणि पक्ष विस्ताराची रणनीती यावर या बैठीकत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराव्यतिरिक्त या बैठकी इतर कोणते निर्णय घेतले जातात? याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा  

लवकरच केंद्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यात देखील मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीला भाजपाचे जवळपास सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तारावर चर्चा होणार आहे. तसेच पक्ष विस्ताराची रणनीती काय असावी? यावर देखील चर्चेची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा 

काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये धाराशिव मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय जाधव यांचा देखील समावेश होता. दरम्यान केंद्रात ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव या शिवसेना शिंदे गटाच्या दोन खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु आता मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे मंत्रिपद नेमकं कोणाला मिळणारं? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान