तिला म्हणाव तू असशील गाैतमी पाटील वगैरे पण… चंद्रकांत पाटलांचा थेट फोन, गाैतमी पाटीलवर अटकेची तलवार

Pune News : चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चंद्रकांत पाटील हे थेट गाैतमी पाटीलला उचलायचे की नाही? असा थेट सवाल डीसीपींना करताना दिसत असल्याने एकच खळबळ उडालीये.

तिला म्हणाव तू असशील गाैतमी पाटील वगैरे पण... चंद्रकांत पाटलांचा थेट फोन, गाैतमी पाटीलवर अटकेची तलवार
Chandrakant Patil and Gautami Patil
| Updated on: Oct 04, 2025 | 9:57 AM

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये त्यांनी थेट डीपीसींना फोन लावला. फक्त फोनच नाही तर गाैतमी पाटीलला उचलायचे की नाही? असा थेट सवालही केला. चंद्रकांत पाटील यांच्या फोननंतर पुणे पोलिसांनी एक नोटीस गाैतमी पाटील हिला पाठवली आहे. गाैतमी पाटील हिचा चाहतावर्ग अत्यंत मोठा असून डान्सच्या माध्यमातून अत्यंत कमी दिवसामध्ये तिने खास ओळख निर्माण केली. मात्र, गाैतमी पाटील हिच्यावर चंद्रकांत पाटील चांगलीच भडकताना दिसत आहेत. हेच नाही तर ती असेल गाैतमी पाटील पण तिने मदत करायला हवी ना? असेही त्यांनी म्हटले.

पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला गाैतमी पाटीलच्या भरधाव कारने धडक दिली. ज्यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. ज्या कारने रिक्षाचालकाला उडवले, ती कार गाैतमी पाटीलच्या नावावर आहे. वडगाव बुद्रुक येथे मागच्या बाजूने गाैतमीच्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यानंतर रिक्षाचे मोठे नुकसान झाले आणि दोन प्रवासी आणि रिक्षाचालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला असून ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी गाडीमध्ये गाैतमी पाटील नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कुटुंबियांनी आरोप केला की, आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवले जात नाही. गाडीमध्ये कोण होते, हे सांगितले जात नाहीये. गाैतमी पाटील हिला अटक करा अशी मागणी आता रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केली. यासोबतच त्यांनी पोलिसांवरही काही गंभीर आरोप केले.

चंद्रकांत पाटलांच्या भेटीसाठी रिक्षाचालकाची मुलगी पोहोचली. यादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना फोन करून म्हटले की, गाैतमी पाटीलला उचलायचे की नाही? ती गाडी कुणाची तरी आहे ना..रिक्षावाला गंभीर आहे. तिला म्हणाव तू असशील गाैतमी पाटील वगैरे पण त्यांचा खर्च तरी कर म्हणाव. ठाकरेंच्या शिवसेनेने देखील गंभीर आरोप करत पोलिस स्टेशनबाहेर आंदोलन केले. गाैतमी पाटीलला अटक करण्याची मागणी सध्या जोर धरू लागलीये.