‘उद्धव ठाकरे, असेल हिंमत तर घ्या जगदंबेची शपथ आणि सांगा….’, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ललकारलं

भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतंच पोहरादेवीची शपथ घेऊन अमित शाह यांच्यासोबत 2019 मध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चेत काय फॉर्म्युला ठरला होता, याबाबत वक्तव्य केलं. त्यानंतर आता बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंजच दिलं आहे.

'उद्धव ठाकरे, असेल हिंमत तर घ्या जगदंबेची शपथ आणि सांगा....', चंद्रशेखर बावनकुळे यांनी ललकारलं
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 6:24 PM

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल भाषण करताना पोहरादेवीची शपथ घेत सांगितलं होतं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदाबाबत अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता. त्यांनी जगदंबेची शपथ घेऊनही हीच गोष्ट सांगितली. पण दुसरीकडे भाजपकडून याबाबत खंडन केलं जातंय. मुख्यमंत्रीपदाबाबत तसा काहीच फॉर्म्युला ठरला नव्हता, असं भाजप नेत्यांकडून स्पष्ट करण्यात येतंय. उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा याबाबतचा उल्लेख केल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना शपथ घेऊन खुलासा करण्याचं आव्हान दिलं आहे.

“उद्धवजी, केंद्र सरकारच्या लोकाहिताच्या योजनांना फसव्या, बोगस म्हणून तुम्ही बांधावर, टपरीवर चर्चा करणार असाल तर, होऊ द्या चर्चा. पण, सध्या एकच चर्चा आहे. ती म्हणजे, तुम्ही जागोजागी देवाधिकांच्या “शपथा” का घेताहात? मग, असेल हिंमत तर एकदा शपथेवर सांगाच”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट चॅलेंज देवून टाकलं.

हे सुद्धा वाचा

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय आव्हान दिलं?

“2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचे फोन तुम्ही का घेतले नाहीत ? घ्या, जगदंबेची शपथ! वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे “सुत ” आहात, तर आता सांगाच तुमचे “सुत” कोणाशी जुळले होते? घ्या शपथ आणि कळू द्या तुमची वचनबद्धता”, असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणखी एक व्हिडीओ ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे यांचं त्यांचा पक्ष वाढवणं हे कामच आहे. पण ते विदर्भात येवून ज्या पद्धतीने बोलत आहेत, खरंतर अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी विदर्भाच्या वैधानिक विकास मंडळाला स्थगिती दिली”, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

“नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले नाही, डीपीसीचे पैसे कमी केले, सिंचन आणि रस्त्यांचा बॅकलॉग वाढला. सत्ता असताना विदर्भाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. विदर्भाची जनता त्यांच्यावर नाराज आहे”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

Non Stop LIVE Update
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर.
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.