मोठी बातमी! जळगावात भाजप नेत्याचा भीषण अपघात, प्रकृती चिंताजनक, घातपाताचा संशय

जळगावमध्ये भाजप नेत्याच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली, एरंडोल तालुक्यातील भालगाव- बोरगाव रस्त्यावर हा अपघात झाला आहे. या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मोठी बातमी! जळगावात भाजप नेत्याचा भीषण अपघात, प्रकृती चिंताजनक, घातपाताचा संशय
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 15, 2025 | 3:44 PM

जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे, एरंडोलचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपा पदाधिकारी दशरथ बुधा महाजन यांचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेत दशरथ महाजन यांचा डावा डोळा पुर्णपणे निकामी झाला असून, ते कोमात गेल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान दशरथ महाजन यांच्या कुटुंबाकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

घटनेबाब अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील भालगाव-बोरगाव रस्त्यावर दशरथ महाजन यांच्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये महाजन हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीनं उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत दशरथ महाजन यांचा डावा डोळा पुर्णपणे निकामी झाला असून, त्यांच्या दोन्ही बाजुच्या  7 बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत.  तसेच त्यांच्या डोक्याला व मेंदूला देखील इजा झाली आहे, ते कोमात गेल्याची माहिती त्यांच्या मुलानं दिली आहे.

जळगावातील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  याप्रकरणी कल्पना दशरथ महाजन यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाजन यांचा घातपात झाल्याचा संशय या फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. दशरथ महाजन यांचा हा अपघात नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय महाजन यांच्या पत्नी आणि मुलगा अक्षय महाजन यांनी व्यक्त केला आहे.

दशरथ महाजन हे एरंडोलचे माजी नगराध्यक्ष आहेत, ते पूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख होते, महिनाभरापूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा भीषण अपघात झाला आहे, दुचाकीला कारने जोरदार धडक दिली, या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात त्यांची पत्नी आणि मुलानं घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.