तर मी स्वत: निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यासाठी…, भाजपच्या बड्या नेत्याचं राज ठाकरेंना खुलं चॅलेंज

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधूंच्या वतीने मुंबईत गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, या मोर्चानंतर भाजप नेत्यानं राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

तर मी स्वत: निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यासाठी..., भाजपच्या बड्या नेत्याचं राज ठाकरेंना खुलं चॅलेंज
raj thackeray
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 3:57 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज निवडणूक आयोगाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने मुंबईत गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली, तसेच दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला, त्यानंतर आता ठाकरे बंधूंच्या टीकेला भाजप नेते परिणय फुके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  त्यांनी थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले परिणय फुके? 

Loading...

राज ठाकरे यांना स्वतःला कोणतीही निवडणूक जिंकता येत नाही. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अशा प्रकारची वक्तव्ये करण्यापेक्षा त्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे. ईव्हीएमवर निवडणूक घेऊ नका, बॅलेटवर घ्या, असे ते म्हणत आहेत. मात्र, आता बॅलेटवर निवडणुका घेण्याची मागणी केली जात आहे. राज ठाकरे यांनी स्वतः आत्मचिंतन करण्याची गरज आहे. २३ ऑक्टोबर रोजी पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही बॅलेटवरच होणार आहे. राज ठाकरे यांना माझे आव्हान आहे की, त्यांनी पदवीधर निवडणुकीत उमेदवार उभा करावा. जर त्यांच्या उमेदवाराला एक हजारांपेक्षा अधिक मते मिळाली, तर मी स्वतः त्यांच्यासोबत बॅलेटवर निवडणुका घेण्यासंदर्भात चर्चा करेन, असं परिणय फुके यांनी म्हटलं आहे.

लोकशाही धोक्यात आलेली नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी लोकशाहीचा मुद्दा पुढे करून ते लोकशाहीला बदनाम करण्याचे काम करत आहेत. हे सर्व राहुल गांधी यांच्या भाषेत बोलत आहेत. मेक इन इंडिया योजनेमुळे देशातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली आहे. देशात औद्योगिक वाढ झाली असून, रोजगारनिर्मितीही झाली आहे.  त्यामुळेच यांच्या पोटात दुखत आहे, असंही यावेळी फुके यांनी म्हटलं आहे. चीनच्या पोटात दुखत असल्याने राहुल गांधी यांच्या पोटात दुखत आहे आणि राहुल गांधी यांची चमचेगिरी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या पोटातही दुखत आहे. चीनची दलाली करण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहे, असंही यावेळी फुके यांनी म्हटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us