AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या गोटात हालचाली, नारायण राणे खरंच लोकसभा निवडणूक लढणार? निलेश राणे म्हणतात…

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सिंधुदुर्गात (Sindhudurga) सुरु आहे. या चर्चांवर नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिलीय.

भाजपच्या गोटात हालचाली, नारायण राणे खरंच लोकसभा निवडणूक लढणार? निलेश राणे म्हणतात...
| Edited By: | Updated on: Jan 24, 2023 | 8:12 PM
Share

सिंधुदुर्ग : भाजपच्या (BJP) गोटात आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या आणखी काही दिग्गज नेत्यांना बोलावलं होतं. अमित शाह यांची या सर्व नेत्यांसोबत सहकार क्षेत्राशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दानवे हे भाजपमधील महाराष्ट्रातील सर्वात जुने मंत्री आहेत. पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराचा मुद्दा अजून रखडलेला आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सिंधुदुर्गात सुरु आहे. या चर्चांवर नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

“नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार, अशी कोणीतरी मुद्दाम बातमी पेरली आहे. पक्ष देईल तोच उमेदवार असेल”, असे वक्तव्य माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे.

नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर उत्तर देताना निलेश राणे म्हणाले की,”नारायण राणेंनी उमेदवारी मागितल्याचे आपल्या ऐकिवात नाही आणि ते मागणारही नाहीत.”

“मला अजून घरातून बाहेर काढलेलं नाही. मी त्याच घरात राहतो. ते तसं बोललेलं मी ऐकलं नाहीय”, अशी कोटीही त्यांनी यावेळी केली.

कुडाळ येथील एका कार्यक्रमात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “गावच्या गावं भारतीय जनता पक्षाकडे वळत आहेत. 2024 पर्यंत शंभर टक्के भाजप, अशीच पावलं आम्ही टाकणार आहोत. 2024 मध्ये पक्षाला न भूतो न भविष्यति असा रिझल्ट महाराष्ट्राच्या विधिमंडळात दिसेल”, असं निलेश राणे यावेळी म्हणाले.

अमित शाहांच्या बैठकीत शिंदे-फडणवीस यांच्यासोबत काय चर्चा झाली?

दरम्यान, अमित शाह यांच्यासोबत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलीय. “आम्ही अमित शाह यांचे आभार मानतो. अतिशय तातडीची बैठक त्यांनी महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या संदर्भात घेतली. या बैठकीत मार्जिंग आणि वर्किंग कॅपिटल, इनकम टॅक्सचे पेंडिंग विषय, लोनचा विषय, असे चार-पाच विषय आहेत. साखर उद्योगामध्ये असलेल्या अडचणी आणि त्यांना सशक्त करण्यासाठीच्या योजना यावर अतिशय सकारात्मक चर्चा झाली”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...