‘भाजप पक्ष माझा थोडी, मी भाजपात’, पंकजा मुंडे यांचं सर्वात मोठं वक्तव्य

पंकडा मुंडे यांनी आज नवी दिल्लीतील कार्यक्रमात धडाकेबाज भाषण केलं. राष्ट्रीय समाज पक्षाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

'भाजप पक्ष माझा थोडी, मी भाजपात', पंकजा मुंडे यांचं सर्वात मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 11:06 PM

नवी दिल्ली : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने दिल्लीत आज राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी धडाकेबाज भाषण केलं. विशेष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांना उद्देशून महत्त्वाचं वक्तव्य केलं. त्यावर पंकजा मुंडे यांनीहीदेखील प्रत्युत्तर दिलं. पंकजाताईंच्या पक्षामुळं समाजाचं हित नाही, असं जानकर म्हणाले. त्यावर पंकजा मुंडे यांनी मी भाजप नाही. तर मी भाजप पक्षाची आहे. भाजप पक्ष खूप मोठा आहे, असं वक्तव्य केलं. तसेच राष्ट्रीय समाज पक्ष हे माझं माहेर आहे. वडिलांशी लढाई झाली तर भावाच्या घरात जाईन, असं देखील सूचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं.

“मला माझे वडील एकदा चौंडीला घेऊन गेले होते. तेव्हापासून मी त्यांना साहेब बोलते. जो गरीब समाजातून आलाय, वंचितांच प्रतिनिधित्व करतात तो खरा साहेब. जे प्रेम मुंडे साहेबांना तेच जानकर-मुंडे जोडीला मिळाले. माझा जन्म मुंडे साहेबांच्या घरात झाला. मला काही कमी नव्हतं”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘भाजपची प्रतिनिधी म्हणून आली नाही’

“राजकारणात माझा आदर्श सुषमा स्वराज आहेत. मी भाजपची मध्य प्रदेशची इन्चार्ज आहे. मी भाजपची प्रतिनिधी म्हणून आली नाही. जानकरांच्या विधानपरिषदेच्या जागेसाठी मी भांडले. 31 मे ला महादेव जानकरांचा कार्यक्रम होता. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पहिलाचा कार्यक्रम झाला. आम्हाला भाग्य तेवढं मिळालं नाही. तेव्हा गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं की राजकीय वारसदार जानकर आहेत”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

‘भाजप माझा थोडी आहे’

“आमचाही नेता चहा विकता विकता बनला की प्रधानमंत्री. माझंही लक्ष राष्ट्रीय समाज पक्षावर आहे. हा पक्ष माझ्या भावाचा आहे. जानकर म्हणाले की ताईंच्या पक्षानं हे केलं. भाजप माझा थोडी आहे. मी भाजपात आहे. भाजप पक्ष मोठा आहे. मुंडे साहेब होते तेव्हा छोट्या-छोट्या माणसांना घेऊन बनवलं. तेव्हा पक्षाने सत्तेचं तोंड पाहिलं”, असं पंकजा आपल्या भाषणात म्हणाल्या.

“मी होते तेव्हा जलयुक्त शिवार योजनेवर काम केलं. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी या योजनेच्या पाहणीसाठी टीम पाठवली होती. या योजनेचा आदर्श पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होत्या. अहिल्याबाई होळकर धर्मरक्षक आहेत. न्यायप्रिय योद्धा अहिल्याबाई होळकर होत्या”, असं पंकजा मुंडे म्हणाले.

‘मला कोणत्या गोष्टीची भीती?’

“मला कोणत्या गोष्टीची भीती आहे? मला कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही. काही झालं तर मी ऊस तोडायला जाईन आणि जानकर जातील फिरायला”, असं सूचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. “सगळे म्हणाले की पंकजा मुंडे हारल्या की सगळं खतम. पण हारल्यानंतर चर्चा झाली. झूकना लोगों को पसंद नहीं. इतिहास होगा मेरा भी नाम आएगा, जानकर साहेब का भी नाम आएगा. मुंडे साहेब म्हणायचे की मी झुकणार नाही. झुकणार नाही म्हणजे हा अहंकार नाही तर स्वाभिमान आहे”, असं वक्तव्य पंकजा यांनी केलं.

‘जानकर साहेब मी तुमच्या पाठीशी’

“ज्यांच्या मागे ताकद आहे त्यांच्या मागे उभं राहा. आता एक केलंय, कार्यक्रम हायजँक करायला सुरूवात झाली आहे. मला कशाचीची भीती वाटत नाही. जानकर साहेब मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही मला वाड्यावर-तांड्यावर गेलेले दिसले पाहिजे. आता तर बायकोही नाही. मजा आहे. तुम्ही जर वर्षभर फिरले तर लोक म्हणतील की एवढ्या जागा घ्या एवढ्या जागा घ्या. या माणसाने कधीही पैसे मागितले नाहीत. माझी अपेक्षा आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“जानकरांना माढा लोकसभा लढवायची इच्छा होती. महादेव जानकर बारामती लढावी, असं मुंडेंचा आग्रह होता. मला तयार केलं की मी सांगितलं. बारामतीत कोणी प्राचाराला आलं नाही. बारामतीच्या इतिहासात एवढ्या कमी मतानं कोणी हारलं नाही. हा बारामतीचा इतिहास आहे”, असंदेखील पंकजा यावेळी म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.