AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस यांनी कुठे जावं, कुठे राहावं ना तुमची..प्रवीण दरेकरांनी शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याला सुनावलं

सिद्धिविनायक मंदिर भ्रष्टाचारावर दरेकर म्हणाले की, "त्यांना या विषयाची माहिती मिळालेली आहे. त्यांनी सभागृहात सांगितलेली आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यावर आरोप करत असताना आपल्या ट्रस्टीनी काय केलं समजून घ्या. एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोटं आपल्याकडे आहेत याचं भान जाणीव असावी असा टोला शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मारलेला"

Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस यांनी कुठे जावं, कुठे राहावं ना तुमची..प्रवीण दरेकरांनी शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याला सुनावलं
devendra fadnavis
| Updated on: Jul 11, 2026 | 3:26 PM
Share

देवेंद्र फडणवीस यांनी देशाचं नेतृत्व करावं अशी भावना एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले की राज्यात एकनाथ शिंदे यांच्याशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांनी केलं. त्याला आता भाजपंकडून प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “बच्चू कडू यांनी बचकडी व्यक्तव्य करू नये. गुण्यागोविंदाने महायुती म्हणून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार करत आहेत, अशा वेळेला कारण नसताना वाद उभा करू नये” अशा शब्दात भाजपं नेते प्रवीण दरेकर यांनी बच्चू कडूंना सुनावलं.

“केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एकनाथ शिंदे यांना खुश करण्यासाठी तुम्ही अपेक्षा व्यक्त करणे ठीक आहे. तुमच्या पक्षाचा प्रमुख नेता मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा करणे काहीच गैर नाही. देवेंद्र फडणवीस यांनी कुठे जावं, कुठे राहावं ना तुमची उंची आहे ना तुमचा अधिकार आहे. ना तुमची आकलन करण्याची तेवढी क्षमता आणि कुवत आहे. त्याच्यामुळे आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या क्षमतेप्रमाणे बोलावं.महायुतीतल्या घटक पक्षाचे आहोत याचं जरा भान त्यांनी ठेवावं. अशी माझी त्यांना मित्रत्वाच्या नात्याने या ठिकाणी विनंती आहे ” अशा शब्दात दरेकरांनी बच्चू कडू यांचा समाचार घेतला.

आपल्याला अधिकार नाही

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावर दरेकर म्हणाले की, “प्रत्येक पक्षांने, पक्षाच्या कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही. हा विषय भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेतृत्व आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या मधला आहे. आपल्याला अधिकार नाही” “त्या विषयावर आपण भूमिका मांडणं. अपेक्षा व्यक्त करणं इथपर्यंत ठीक आहे. कोणी कुठे जावं, कुठे राहावं मला वाटतं हे मूर्खपणाचं बोलणं त्या ठिकाणी होईल” असं दरेकर म्हणाले.

आमचं नेतृत्व सक्षम आहे

“आमचा पक्ष सक्षम आहे. आमचं नेतृत्व सक्षम आहे. देवेंद्रजींना कधी काय करावं, कुठे जावं कुठे राहावं याची पूर्णपणे जाणीव त्या ठिकाणी आहे. शीर्षस्थ नेतृत्वा सोबत त्या ठिकाणी त्यांचा समन्वय सदैव असल्यामुळे पक्ष भूमिका या संदर्भात घेत असतो” असं प्रवीण दरेकर म्हणाले.

कोण बडबडतय याचं भान ठेवा

“संजय राऊत यांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता त्या ठिकाणी नाही. तुम्ही दुसऱ्यांमध्ये डोकावून बघण्यापेक्षा आपल्या पक्षाची सूत्र त्या ठिकाणी कोणाच्या हातात आहेत, कोण बडबडतय याचं भान ठेवा. आमच्या पक्षातला निर्णय संजय राऊत यांच्या भूमिकेवर वक्तव्यावर होत नसतो. आमचं केंद्रीय नेतृत्व आणि देवेंद्रजी यांच्या एकत्रितपणे समन्वयाने निर्णय होत असतो” असं दरेकर म्हणाले. “आमच्या पक्षाला एक व्यवस्थित सिस्टीम आहे. शिस्तीचा पक्ष तुमच्यासारखा बेताल वक्तव्य करत नाही” असं दरेकर यांनी सांगितलं.

Follow Us
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...