AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sudhir Mungantiwar | सोनिया गांधी संविधानापेक्षा मोठ्या आहेत का? काँग्रेसच्या आंदोलनावरून सुधीर मुनगंटीवारांचा सवाल

सोनिया गांधींच्या चौकशीविरोधात काँग्रेसची आंदोलनं सुरु आहेत. यावर तीव्र प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ' सोनिया गांधी काय संविधानापेक्षा मोठ्या आहेत? इटाली या देशात त्यांचा जन्म झाल्यामुळे या देशातील 138 कोटी जनतेपेक्षा वरचा दर्जा आहे का त्यांना? असा सवाल त्यांनी केला.

Sudhir Mungantiwar | सोनिया गांधी संविधानापेक्षा मोठ्या आहेत का? काँग्रेसच्या आंदोलनावरून सुधीर मुनगंटीवारांचा सवाल
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 21, 2022 | 6:12 PM
Share

मुंबईः काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची ईडीमार्फत चौकशी सुरु आहे. यावरून देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमार्फत निदर्शनं (Congress protest) सुरु आहेत. पण सोनिया गांधी काय देशातील १३८ कोटी जनतेपैकी नाहीत का? संविधानापेक्षा त्या मोठ्या आहेत का, असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला. चंद्रपूरमध्ये त्यांनी आज माध्यमांसमोर ही प्रतिक्रिया दिली. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची आज ईडीमार्फत सलग तीन तास चौकशी करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी दर्शवली. नवी दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यालयाभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

सोनिया गांधींना काय विशेष दर्जा आहे?

सोनिया गांधींच्या चौकशीविरोधात काँग्रेसची आंदोलनं सुरु आहेत. यावर तीव्र प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘ सोनिया गांधी काय संविधानापेक्षा मोठ्या आहेत? इटाली या देशात त्यांचा जन्म झाल्यामुळे या देशातील 138 कोटी जनतेपेक्षा वरचा दर्जा आहे का त्यांना…. मा. मोदीजींची 9-9तास सीबीआय मार्फत चौकशी केली. एकही कार्यकर्ता आंदोलनाला गेला नाही. आम्ही हीच भूमिका घेतली.. चौकशी करायची असेल तर आम्ही मदत केली. 9 तास मोदींजींनी सहाकर्य केलं. चौकशीला बोलावलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही गुन्हेगार आहात. नॅशनल हेरॉल्ड या केसमध्ये काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाले. कोट्यवधी रुपयांची संपत्ती थोड्या पैशात विकत घेण्यात आली. असं झालं नसेल तर सांगानं.. तुम्हाला काही धोका नाही..  आणि मग आणीबाणीत १९ महिने निरपराध लोकांची उध्वस्त करताना तुम्हाला काही वाटलं नाही. तुम्ही लोकांना जेलमध्ये टाकलं. नॅशनल हेरॉल्डची हजारो कोटी रुपयांची कंपनी तुम्ही घेतली नव्हती? ढापली नव्हती? इथं फक्त चौकशीसाठी बोलावलं तर आंदोलनं करता? घटनेवर विश्वास नाही? दबावाचं राजकारण करता? लोकशाहीत अशा पद्धतीचं राजकारण करणं याचा अर्थ यांचा लोकशाहीवर विश्वास नाही…

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण काय?

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी द असोसिएटेड जर्नल लिमिटेड या कंपनीद्वारे नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र सुरु केले होते. 2008 मध्ये ते बंद पडले. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या यंग इंडिया कंपनीने 2010 मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने नॅशनल हेरॉल्डला 90 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. द असोसिएटेड जर्नलची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या 50 लाखात खरेदी केल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्याम स्वामी यांनी केला होता. 2013 साली सुब्रमण्यम यांनी दिल्ली सत्र न्यायालयात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात आयकर विभागाने सोनिया गांधींसह राहुल गांधींचीही चौकशी करण्यात आली होती. आता ईडीतर्फे त्यांची चौकशी होत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.