AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन् वैद्यनाथची साखर पाहून पंकजा मुंडेंना अत्त्यानंद…!

अठरा महिन्याच्या विश्रातीनंतर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना यावर्षी पुन्हा एकदा तितक्याच ताकदीने सुरु झाला आहे.

अन् वैद्यनाथची साखर पाहून पंकजा मुंडेंना अत्त्यानंद...!
| Updated on: Jan 08, 2021 | 9:55 PM
Share

परळी (बीड) : अठरा महिन्याच्या विश्रातीनंतर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना यावर्षी पुन्हा एकदा तितक्याच ताकदीने सुरु झाला आहे. गेल्या 19 दिवसात उत्पादित झालेली साखर पाहून कारखान्याच्या अध्यक्षा तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अत्त्यानंद झाला. हा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवत होता. ‘वैद्यनाथ’ च्या यंत्राची धडधड म्हणजे जणू लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अस्तित्वाचाच भास त्यांना यावेळी जाणवला. (BJP Pankaja Munde Visit Vaidyanath Sugar Factory)

मध्यंतरीच्या दुष्काळामुळे वैद्यनाथ कारखाना गेली अठरा महिने बंद होता. नैसर्गिक संकट आणि आर्थिक विवंचनेत कारखाना सुरु करणे तशी तारेवरची कसरत होती परंतु पंकजा मुंडे यांनी सर्व संकटावर मात करत कारखाना पुर्ववत सुरु करण्यात यश मिळवले.

गेल्या 19 दिवसांत कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा 62 हजार मेट्रिक टन ऊस गाळप केला असून 48 हजार साखरेच्या पोत्यांचे उत्पादन केले आहे. दररोज 3 हजार 500 मेट्रिक टन ऊस गाळप करत असलेला वैद्यनाथ येत्या दोनच दिवसांत 4 हजार मेट्रिक टन क्षमतेने ऊस गाळप करणार आहे, तसे नियोजन कारखान्याने केले आहे.

अन् पंकजाताईंनी केली साखर वाटप

पंकजा मुंडे आज दिवसभर वैद्यनाथ साखर कारखान्यावर होत्या. वैद्यनाथ आणि पानगांव कारखान्याच्या गळीत हंगामाचा अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर कारखान्यात जाऊन यंत्रणेची पाहणी केली.

कारखान्याने उत्पादित केलेली तीन प्रकारची साखर पाहून त्यांना आनंद झाला. एवढंच नव्हे तर ती साखर उपस्थित अधिकारी, कर्मचारी व संचालकांना वाटप करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. वैद्यनाथ हा लोकनेते मुंडेसाहेबांचा जीव की प्राण होता, अगदी तीच आठवण पंकजाताई मुंडे कारखान्याची पाहणी करताना उपस्थितांना आली.

(BJP Pankaja Munde Visit Vaidyanath Sugar Factory)

संबंधित बातम्या

परळीत भाजप-राष्ट्रवादी एकत्र, पंचायत समिती सभापतीवर अविश्वास

आधी उर्मिला गित्तेंनी सभापतीपद गमावलं, नंतर पतीला अटक, परळीत तणाव

परळीत मुंडे Vs मुंडे, लेटर वॉरचा भडका

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.