AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! विरोधकांच्या आधीच डाव साधला, राज्यात भाजपची मोठी खेळी, नेत्यांची फौज मैदानात, राणे, पडळकरांकडे मोठी जबाबदारी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. मात्र जरी असं असलं तरी देखील भाजपनं आतापासूनच तयारी सुरू केल्याचं पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! विरोधकांच्या आधीच डाव साधला, राज्यात भाजपची मोठी खेळी, नेत्यांची फौज मैदानात, राणे, पडळकरांकडे मोठी जबाबदारी
नितेश राणे, गोपिचंद पडळकरांवर मोठी जबाबदारी Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 01, 2026 | 5:38 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. अजून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला वेळ आहे. मात्र आतापासूनच भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला सुरुवात झाल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात लवकरच पदवीधर आणि शिक्षक मतदारसांघाच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर देखील भाजपची ही खेळ महत्त्वाची मानली जात आहे. सध्या देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. विरोधी पक्ष एकवटला असून, ज्ञानेश कुमार यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांकडून निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप करण्यात आला आहे.  तोच मुद्दा पकडून विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा देखील प्रयत्न सुरू आहे.

तसेच दुसरीकडे राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकरी हातबल झाला आहे. गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडून महाराष्ट्रात दुष्काळाची घोषणा करण्यात आली. जवळपास राज्याच्या 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु यावरून देखील विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी ज्या उपाय योजना करण्यात येत आहेत, त्या अपुऱ्या असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. दुष्काळाच्या मुद्द्यावरून येत्या काळात विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. विरोधकांच्या नरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपची फौज मैदानात उतरली आहे.  महाराष्ट्र भाजपकडून महत्त्वाच्या नेत्यांवर उत्तर देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  मंत्री आशिष शेलार, नितेश राणेंसह आमदार प्रवीण दरेकर, संजय कुटे , गोपीचंद पडळकर यांना भाजपच्या वतीने  मैदानात उतरवण्यात आले असून, त्यांच्यावर मोठी जबादारी सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे  महिला नेत्यांमध्ये आमदार चित्रा वाघ, देवयानी फरांदे यांच्याकडे देखील विरोधकांना उत्तर देण्याची  जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर युवांमध्ये आमदार विक्रम पाचपुते, निरंजन डावखरे व मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावरही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विरोधकांनी भाजपला घेरण्यापूर्वीच भाजपने प्रत्युत्तराची तयारी केल्याचं आणि विरोधकांचे आरोप खोडून काढण्याची तयारी केली आहे.

Follow Us
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत