Uddhav Thackeray : शिवसेना कोणाची? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना कोर्टाबाहेर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

Uddhav Thackeray : शिवसेना कोणाची, यावर सुप्रीम कोर्टात खटल्याची सुनावणी सुरु असताना न्यायालयाबाहेर मात्र वेगळं घडलं. सध्या कपिल सिब्बल जो युक्तीवाद करतायत, त्या पार्श्वभूमीवर चार वर्षापूर्वीची स्थिती आणि आजची परिस्थिती यावर हे चित्र खूप बोलकं आहे.

Uddhav Thackeray : शिवसेना कोणाची? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना कोर्टाबाहेर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
Uddhav Thackeray-Eknath Shinde
| Updated on: Aug 18, 2026 | 5:12 PM

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची? ठाकरेंची की शिंदेंची यावर सुनावणी सुरु असताना आज कोर्टाबाहेर मात्र उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला. उद्धव ठाकरे गटाच्यावतीने युक्तीवाद करणारे ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांच्यामते विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा आहे. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने विधिमंडळाला पक्षाच्या संख्याबळाच्या आधारावर एकतर्फी निर्णय घेतला, असं सिब्बल यांचं म्हणणं आहे. विधिमंडळातला एक गट एकनाथ शिंदेंसोबत गेला असला, तरी राजकीय पक्ष मात्र उद्धव ठाकरेंकडेच आहे, असा त्यांचा युक्तीवादाचा मुद्दा आहे. पण सध्या ग्राऊंड लेव्हलवर वेगळं चित्र दिसतय. आज कोर्टात शिवसेना कोणाची? युक्तीवाद सुरु असताना इथे कल्याणमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला. कल्याण पूर्वेत उबाठाला मोठा धक्का बसला. युवासेना उपजिल्हाप्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष प्रवेशाचं हे चित्र खूप बोलकं आहे.

कल्याण पूर्वेतील उबाठा गटाला मोठा धक्का देत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमंत केणे, शाखाप्रमुख संभाजी सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षांतराचा निर्णय घेतला. उपशाखाप्रमुख विनोद चव्हाण, हेमंत जाधव आणि अन्य शिवसैनिकांचाही शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने पक्षप्रवेश सोहळा पार पडला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शेकडो नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा जाहीर पक्षप्रवेश संपन्न झाला. आगामी स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील उबाठा गटाच्या संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का मानला जात आहे.

कोर्ट काय निकाल देईल? हे आपल्याला माहित नाही

सर्वोच्च न्यायालय या खटल्यात काय निकाल देईल? हे आपल्याला माहित नाही. पण 2022 साली शिवसेनेत फूट पडल्यापासून चित्र वेगळं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा वेगाने विस्तार सुरु आहे. पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्याचा खूप फायदा झाला. अधिकृत शिवसेना आज त्यांच्याकडे असल्याने ठाकरे गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने अधिकृत शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सध्या कुठलीही निवडणूक नाहीय, तरीही हे पक्ष प्रवेश सुरु आहेत. यामुळे उद्धव ठाकरे गट दिवसेंदिवस अजून कमकुवत होत चालला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us