
BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात एकूण 29 महापालिकांची निवडणूक होत आहे. परंतु या निवडणूक मुंबईची निवडणूक राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इथं विजय मिळवण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी चांगलाच जोर लावला आहे. दुसरीकडे भाजपा आणि शिंदे यांची शिवसेना यांनही पूर्ण ताकद लावली आहे. दरम्यान, प्रत्यक्ष मतदानाचा दिवस जवळ आल्यामुळे आज (11 जानेवारी) राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईच्या शिवतीर्थावर संयुक्त सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. भाजपाचा मुंबई अदाणी यांना विकण्याचा डाव आहे. तसेच मुंबईचे बॉम्बे करण्याचाही कट आहे, असा हल्लबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि त्यासाठी देण्यात आलेला लढा, यावर भाष्य केला. यावेळी मुंबई महापालिकेचा महापौर हिंदूच होणार, असे भाजपाकडून सांगितले जात आहे. यावर बोलताना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जनसंघ कुठेही नव्हता. संयुक्त महाराष्ट्र समिती माझे आजोबा आणि इतरांनी स्थापन केली होती. सर्व पक्ष एकत्र आले होते. मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे असे तेव्हा धोरण होते. तेव्हाही गुजरातचा मुंबईवर डोळा होता. तो मोरारजी देसाई हा नरराक्षक गुजरातमध्ये जन्मला होता. त्याने संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढणाऱ्या आंदोलकांना गोळ्या घालण्याचा आदेश दिला. मोरारजी देसाई हा हिंदूच होता, असे म्हणत त्यांनी भाजपाला लक्ष्य केले.
तसेच पुढे बोलताना या लढ्यात अण्णाभाऊ साठे होते. तसेच अमर शेख होते. दो कौडी का मोल, मराठा बिकने को तैयार नाही, असं अमर शेख ठासून सांगायचे, असे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला संपूव नये, असे ठणकावून सांगितले.
मुंबईचं परत बॉम्बे करायचा डाव त्यांच्या मनात आहे का? नुकताच मुंबईत अण्णामलाई आला. तो भाजपाच्या मनातलं बोलला, असे म्हणत त्यांनी भाजपावर टीका केली. आम्हाला महापालिका का पाहिजे हे आम्ही स्पष्ट सांगतोय. त्यांना मुंबई का पाहिजे तर मुंबई अदानीच्या घशात घालायची आहे. मुंबईत प्रदूषण बांधकामामुळे झाले आहे. या बांधकामांसाठीचं ७० टक्के सिमेंट अदानीकडून घेतलं जात आहे, असा मोठा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.