AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात मायग्रेनचा त्रास जास्त सतावतोय? आराम मिळवण्यासाठी या टिप्स ठेवा लक्षात

थंडीच्या दिवसात मायग्रेनचा त्रास अनेकदा वाढतो. त्यामुळे हिवाळ्यात हा त्रास अधिक सतावू नये यासाठी योग्य काळजी घेतली पाहिजे. चला तर मग आजच्या लेखात आपण मायग्रेनच्या त्रासापासून आराम मिळावा यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेऊयात.

हिवाळ्यात मायग्रेनचा त्रास जास्त सतावतोय? आराम मिळवण्यासाठी या टिप्स ठेवा लक्षात
migraneImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Feb 28, 2026 | 3:36 PM
Share

हिवाळ्यात मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांना अनेकदा तीव्र डोकेदुखी सुरू होते आणि जेव्हा ताण वाढतो तेव्हा झोपेची पद्धत बिघडते आणि वेदना आणि वाढू शकतात. थंड हवा, तापमानात अचानक बदल आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे डोकेदुखीचा त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते. मायग्रेन ही एक तीक्ष्ण, धडधडणारी डोकेदुखी आहे जी सामान्यतः डोक्याच्या एका बाजूला होते आणि या त्रासामुळे मळमळ, उलट्या किंवा प्रकाश, मोठा आवाज सहन न होणे अशा समस्या निर्माण होतात. हिवाळ्यात कमी दिवस, कमी शारीरिक हालचाल आणि झोपेच्या पद्धती यामुळे मायग्रेनचा धोका आणखी वाढतो.

याव्यतिरिक्त थंडीमुळे स्नायू कडक होणे आणि रक्ताभिसरणात बदल होणे यामुळे देखील मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. बरेच लोकं हिवाळ्यात पाणी कमी प्रमाणात पितात, ज्यामुळे डिहायड्रेशन होते आणि मायग्रेनचा झटका येऊ शकतो आणि या सर्वांचा परिणाम आपल्या रोजच्या दैनंदिन कामकाजावरही होऊ लागतो. अशा वेळेस योग्य काळजी घेतल्यास आणि काही आवश्यक खबरदारी घेतल्यास मायग्रेनचा त्रास बऱ्याच प्रमाणात नियंत्रित केला जाऊ शकतो. तर आजच्या लेखात आपण हिवाळ्यात मायग्रेनचा त्रास अधिक वाढू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी ते जाणून घेऊयात.

हिवाळ्यात मायग्रेनची काळजी कशी घ्यावी?

तज्ञांच्या म्हणण्यानुसार मायग्रेनचा त्रास वाढू नये यासाठी संतुलित दैनंदिन दिनचर्या राखा. दररोज वेळेवर झोपणे आणि उठणे महत्वाचे आहे. थंडी टाळण्यासाठी, थंड हवेचा परिणाम कमी करण्यासाठी तुमचे डोकं आणि कान झाकून ठेवा. भरपूर कोमट पाणी प्या आणि डिहायड्रेशन टाळा.

हलका व्यायाम, योगा किंवा स्ट्रेचिंग करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

कॅफिन आणि तळलेले पदार्थांचे सेवन करणे टाळा. त्यातच अधिक ताणामुळे मायग्रेन त्रास होऊ शकतो, म्हणून ध्यान किंवा खोल श्वास घेण्याचे प्रकार अवलंबवा. तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घ्या.

खबरदारी जाणून घ्या

हिवाळ्यात थेट अति थंडीत किंवा प्रखर सूर्यप्रकाश जाणे टाळा.

जास्त वेळ मोबाईल फोन किंवा स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर आणि डोक्यावर दबाव येतो, ज्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो.

उपाशी राहणे टाळा आणि जेवणाच्या वेळा नियमित ठेवा.

तीव्र वास, धूर किंवा मोठा आवाजात जाणे टाळा. मद्यपान आणि धूम्रपानामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो, म्हणून ते टाळणेच चांगले.

हे देखील आवश्यक आहे

जर मायग्रेनचा त्रास वारंवार होत असेल किंवा पूर्वीपेक्षा जास्त तीव्र झाला असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. यामुळे योग्य उपचार मिळण्यास मदत होईल. वेळेवर काळजी घेतल्यास आणि योग्य सवयींचा अवलंब केल्यास हिवाळ्यातही मायग्रेन नियंत्रणात ठेवता येते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
मोठी बातमी! चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! चिंचवडच्या यात्रेतील व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक
Pune -Nashik | पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर
स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड
Pune | स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड, विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप
म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा
.....म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा
उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी
मोठी घडामोड! उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ
सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत
Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत मंजूर
बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील?
Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास
तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत
Pune | तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....