Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ.. बुलढाण्यातील घटनेने खळबळ

बुलढाणा जिल्ह्यातील एका रुग्णालयात एक अद्भुत घटना घडली आहे. गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटात आणखी एक बाळ असल्याचे सोनोग्राफीमध्ये आढळून आले आहे. हे 'फीटस इन फीटू' नावाच्या दुर्मिळ वैद्यकीय स्थितीचे उदाहरण आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण केली आहे.

आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ.. बुलढाण्यातील घटनेने खळबळ
आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ.. बुलढाण्यातील घटना
Follow us
| Updated on: Jan 29, 2025 | 11:46 AM

देवाची करणी आणि नारळात पाणी.. अशी एक म्हण आपल्यापैकी बऱ्या लोकांनी आत्तापर्यंत ऐकली असेल. म्हणजे निसर्ग किंवा देव काहीही करू शकतो, असा काहीसा त्याचा अर्थ. या निसर्गात, सृष्टीत असे काही प्रकार घडतात, काही अशी गूढ असतात ज्याचा आपल्या मतीला अर्थ लागू शकत नाही. असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. तेथे एक गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी रुग्णालयात गेली होती. मात्र त्या महिलेच्या पोटात जे बाळ होतं, त्याच बाळाच्या पोटात आणखीन एक बाळ असल्याचे उघडकीस आलं आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षांची एक महिला 3 दिवसांपूर्वी सोनोग्राफी करण्यासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आली होती. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. या महिलेला आधी 2 अपत्यं असून ती तिसऱ्यांदा गर्भवती आहे. सोनोग्राफी करताना त्या महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटात आणखी एक बाळ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आलं. निसर्गाने मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर महिला प्रजनन करण्यास सक्षम होतात. मात्र, महिलेच्या पोटात बाळ आणि त्याच बाळाच्या पोटात आणखी एक बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले. 9 महिन्यांच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत आहे.

मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला ‘फीटस इन फीटू’ असे म्हणतात. अर्भकांमध्ये अर्भक असणे ही अशी घटना आहे. यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते. साधारणत: 5 लाख गर्भवती महिलांमध्ये एखादीच्या बाबतीतच अशी केस एखादी आढळते. सध्या त्या बाळाच्या जीवाला काहीही धोका नाही, मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भागवत भुसारी यांनी दिली आहे. त्या बाळाचा जन्म झाल्यानतर परिस्थिती काय असेल, त्यानुसार निर्णय घेऊ, त्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेऊ असेही डॉक्टरांनी नमूद केलं.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.