AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला आरोपींची नावे पाठवा…’ उद्धव ठाकरेंचा मारहाण झालेल्या महिलेला फोन, नेमकं काय म्हणाले?

Buldhana News : बुलढाण्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला होता. यावेळी एका महिलेला मारहाण देखील करण्यात आली होती. आता उद्धव ठाकरे यांनी या महिलेला फोन करून घटनेची माहिती घेतल्याचे समोर आले आहे.

'मला आरोपींची नावे पाठवा...' उद्धव ठाकरेंचा मारहाण झालेल्या महिलेला फोन, नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray buldhanaImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 22, 2026 | 2:45 PM
Share

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सार्वजनिक ठिकाणावरून हटवण्याचा कारणावरून दोन गटात वाद होऊन तुफान हाणामारी झाली होती. यावेळी संजीवनी वाघ या महिलेला मारहाण देखील करण्यात आली होती. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच आता चिखला गावात रात्री शिव भक्तांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारला आहे. त्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजीवनी वाघ यांना फोन करून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

उद्धव ठाकरे यांचा संजीवनी वाघ यांना फोन

शिवरायांच्या पुतळ्याच्या अवमानामुळे चिखला गावात तणावाचे निर्माण वातावरण तयार झाले होते. त्यानंतर आता पुन्हा शिवभक्तांनी शिवरायांचा पुतळा उभारला आहे. त्यानंतर आज मोठ्या संख्येने आज शिव भक्त चिखला गावात दाखल झाले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. अशातच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजीवनी वाघ यांना फोन करून संपूर्ण प्रकरणांची माहिती घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी, मला आरोपींची नावे पाठवा; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कुठलाच आरोपी मोकाट सुटता कामा नये. गावात शांतता ठेवा असे आवाहन संजीवनी वाघ आणि गावकऱ्यांना केले आहे.

संजीवनी वाघ यांनी या संपूर्ण घटनेबाबत बोलताना म्हटले होते की, सायंकाळी 4 ते 5 च्या सुमारास 200 ते 300 महिला आणि पुरुष एकत्र येऊन आमच्या गटावर हल्ला केला. सुमारे 30 ते 35 जणांनी माझ्या अंगावरील कपडे फाडत मारहाण केली. काही महिलांनी पोलिसांनाही घेराव घातला होता. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वाघ यांनी केली होती.

पोलिसांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केली – जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवर बोलताना म्हटले की, ‘तिथे काही मस्तवाल माजलेल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्यांचा उद्देश होता की महाराजांचा पुतळा फेकून द्यायचा असं गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं. तिथे आमच्या एका जिजाऊ च्या लेकीला कपडे फाटेपर्यंत मारलं. येथील काही स्थानिक पोलिसांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केली असे आम्हाला सांगण्यात आले. एवढा माज कोणाला आहे? छत्रपती शिवरायांशी एवढा राग कसा काय आहे? तिथे कोण कोण माजलेल आहे आम्हाला बघू द्या. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही पाहिजे असा त्यांनी प्रयत्न केला आहे.’

Follow Us
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज