युवकाचे महिन्याभरापूर्वी लग्न झाले, शेतात कामासाठी गेला तो शेवटचाच

| Updated on: Jun 05, 2023 | 6:45 PM

यात निंबाच्या झाडाची फांदी तुटून थेट किशोरच्या डोक्यावर पडली. यामुळे किशोर जागीच ठार झाला. महिन्याभरापूर्वी किशोरचे लग्न झाले होते.

युवकाचे महिन्याभरापूर्वी लग्न झाले, शेतात कामासाठी गेला तो शेवटचाच
Follow us on

गणेश सोळंकी, प्रतिनिधी, बुलढाणा : माटरगावचा किशोर खोडके याचे महिनाभरापूर्वी लग्न झाले. संसाराला लागला. दोनाचे चार हात झाल्याने घरच्यांनी सुखाचा निःश्वास टाकला. किशोरही शेतात काम करू लागला. सध्या वादळ वारं जोरात सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस येत आहे. काही ठिकाणी गारपीटही पडत आहे. मान्सूनची सुरुवात असल्यामुळे शेतकरी कामाला लागला आहे. शेतावर गेल्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय नाही.

किशोर हा काल शेतावर गेला होता. अचानक वादळ, वारं सुटलं. त्यामुळे किशोरने निंबाच्या झाडाचा आसरा घेतला. जोरदार वादळ सुटलं. यात निंबाच्या झाडाची फांदी तुटून थेट किशोरच्या डोक्यावर पडली. यामुळे किशोर जागीच ठार झाला. महिन्याभरापूर्वी किशोरचे लग्न झाले होते. त्यामुळे या दुर्घटनेने त्याच्या पत्नीवर फार मोठा आघात कोसळला आहे.

 

हे सुद्धा वाचा

24 वर्षीय तरुणाचा बळी

बुलढाणा जिल्ह्यात काल दुपारी ठिकठिकाणी वादळाचा चांगलाच तडाखा बसलाय. खामगाव तालुक्यातील माटरगावात या वादळाने एका 24 वर्षीय तरुणाचा बळी घेतला. शेतातील निंबाच्या झाडाची फांदी अंगावर पडली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झालाय.

 

शेतात काम करताना तुफान वादळ

माटरगाव येथील 24 वर्षीय तरुण किशोर ज्ञानेश्वर खोडके असे मृत तरुणाचे नाव आहे. निंबाच्या झाडाची फांदी अंगावर पडून त्याचा मृत्यू झालाय. किशोर खोडके हा शेतात काम करीत होता. मात्र अचानक तुफान वादळ आलं.

महिन्याभरापूर्वी झाले होते लग्न

शेतात काम करत असताना निंबाच्या झाडाची मोठी फांदी किशोरच्या अंगावर पडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. किशोरच एक महिन्याआधीच लग्न झाले होते. या दुर्दैवी घटनेने माटरगावावर शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्यात वादळ-वाऱ्यासह पाऊस येत आहे. वातावरणात बदल झाला आहे. शेतीची काम सुरू आहेत. यासाठी शेतकरी शेतावर जातो. अशावेळी ही दुर्घटना घडली आहे. शेतकऱ्यांनी शेतावर जाण्यापूर्वी हवामानाचा अभ्यास करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.