Buldana Sports | बुलडाण्याच्या दिव्यांग अनुराधा सोळंकीची पोलंडसाठी निवड; व्हीलचेअर तलवार बाजीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणार का?

पोलंडमधील वर्ल्डकपमध्ये व्हीलचेअर तलवारबाजी खेळणार आहे. दिव्यांगांच्या व्हीलचेअर तलवार बाजीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेली बुलडाण्याची अनुराधा सोळंकी ही महाराष्ट्रातील पहिली कन्या आहे. तिची निवड आता पोलंड येथे होणाऱ्या वर्ल्डकपसाठी झालीय. मात्र तिची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने पैशांअभावी तिची वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी धूसर होताना दिसत आहे.

Buldana Sports | बुलडाण्याच्या दिव्यांग अनुराधा सोळंकीची पोलंडसाठी निवड; व्हीलचेअर तलवार बाजीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणार का?
बुलडाण्याच्या दिव्यांग अनुराधा सोळंकेची पोलंडसाठी निवडImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 12:20 PM

बुलडाणा : जिल्ह्यातील चिखली (Chikhali) तालुक्यातील पाटोदा या छोट्याश्या गावात अनुराधा सोळंकी (Anuradha Solanki) आपल्या आई-वडिलांसोबत राहते. परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने आई-वडिलांसोबत तिने मोलमजुरी केली. आपले एम. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. मंत्रालयात वेटर पदावर तिला नोकरी लागली. तिला लहानपणापासूनच खेळाची आवड आहे. मुंबईत तिची ओळख तलवारबाजीतील (Swordsman) काही प्रशिक्षकांसोबत झाली. आणि तिने मंत्रालयातील वेटरची नोकरी सांभाळून तलवारबाजीचा सराव देखील सुरू ठेवला. त्यामध्ये तिने आपल्या खेळातील कौशल्य दाखवले. नॅशनल, इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये अनेक पदके मिळवली आहेत. त्या माध्यमातून तिची पोलांडमधील वर्सोवा येथे होणाऱ्या व्हीलचेअर तलवारबाजी वर्ल्ड कपसाठी निवड झाली आहे.

वर्ड कपसाठी बुलडाण्यात सराव

अनुराधाचा सराव सुरू असतानाच गेल्या तीन महिन्यांपूर्वी तिची बुलडाणा येथे बदली झाली. ती सध्या जिल्हा पुरवठा विभागामध्ये शिपाई या पदावर कार्यरत आहे. पोलंड येथे 7 ते 10 जुलै दरम्यान होत असलेल्या वर्ल्ड कपसाठी ती बुलडाणामध्ये सराव करत आहे. आपण देशासाठी सुवर्णपदक मिळवू, याचा तिला विश्वास आहे. आणि त्या पद्धतीने ती मेहनत सुद्धा घेत आहे. मात्र तिची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. या स्पर्धेमध्ये जाण्यासाठी एकूण 8 ते 9 लाख रुपये खर्च येत आहे. आपण या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार का ? , याची चिंता तिला सतावत आहे.

दानशुरांच्या मदतीची गरज

दिव्यांग कन्येला वर्डकप खेळण्यासाठी मदतीचा हात हवाय. पोलंडमधील वर्ल्डकपमध्ये व्हीलचेअर तलवारबाजी खेळणार आहे. दिव्यांगांच्या व्हीलचेअर तलवार बाजीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेली बुलडाण्याची अनुराधा सोळंकी ही महाराष्ट्रातील पहिली कन्या आहे. तिची निवड आता पोलंड येथे होणाऱ्या वर्ल्डकपसाठी झालीय. मात्र तिची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने पैशांअभावी तिची वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी धूसर होताना दिसत आहे. अनुराधाला मदतीची अपेक्षा आहे. दानशूर व्यक्तींनी तिला मदत करावी, असे आवाहन करण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.