AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

80 फूट दरीत कोसळलेला ट्रक अडकला झाडावर, घटना कॅमेऱ्यात कैद

विशेष म्हणजे ट्रक दरीत कोसळत असताना तो कॅमेऱ्यात कैद झाला.

80 फूट दरीत कोसळलेला ट्रक अडकला झाडावर, घटना कॅमेऱ्यात कैद
रस्त्याच्या कडेला फसलेला ट्रक 80 फूट दरीत कोसळला Image Credit source: tv 9
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Oct 10, 2022 | 10:22 PM
Share

गणेश सोलंकी, TV9 मराठी, प्रतिनिधी, बुलढाणा : ही थरारक घटना आहे सोलापूर (Solapur)- बुऱ्हाणपूर – इंदोर महामार्गावरील. बुलढाणा शहरानजीक असलेल्या राजूर (Rajur) घाटात एक ट्रक बुलढाण्याकडे जात होता. तेवढ्यात ट्रक रस्त्याच्या कडेला फसला. या रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकमुळं वाहतूक (Traffic) विस्कळीत झाली. दोन्ही बाजूला रांगा लागल्या. एका बाजूला डोंगर तर, दुसऱ्या बाजूला खोल दरी अशी परिस्थिती होती.

वरच्या भागातून वाहनं जात होती. पण एकेरी वाहतूक असल्यानं वाहतुकीची कोंडी झाली. खालच्या भागात फसलेला ट्रक होता. या ट्रकला काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.

पण, चालक, वाहक त्यात यशस्वी झाले नाहीत. ते ट्रकच्या बाजूला उभे होते. तेवढ्यात ट्रक धाडकन खाली कोसळला. तो थेट 80 फूट खोल दरीत. या दरीत असलेल्या एका झाडाला तो ट्रक अडकला असल्याचं सांगितलं जातं.

ही घटना आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे ट्रक दरीत कोसळत असताना तो कॅमेऱ्यात कैद झाला. ही थरारक अशी घटना पाहून अनेकांचे डोळे दिपले.

सुदैवाने या ट्रकचा चालक आणि वाहक ट्रकमध्ये नसल्याने बचावले आहेत. मात्र ट्रक 80 फूट खोल दरीत कोसळला. त्यामुळे ट्रकचे आणि त्यातील साहित्याचं मोठं नुकसान झालंय.

राजूर घाटात ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारात घडली. ट्रक रस्त्याच्या बाजूला अडकला होता. त्याला काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण, त्यात यश मिळू शकलं नाही.

ट्रक उभा असलेल्या ठिकाणाच्या खालच्या भागात दरी होती. उभा ट्रक थेट त्या दरीत कोसळला. त्यामुळं ट्रकच्या साहित्याचं नुकसान झालं. पण, ट्रकमध्ये कुणीही नसल्यानं जीवितहानी झाली नाही.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?