उद्धव ठाकरे ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करणार? बुलढाण्यातील घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

| Updated on: Nov 26, 2022 | 5:11 PM

उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंद करण्याबाबत सूचक विधान केलं होतं. त्यानंतर आज बुलढाण्यात उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आलाय.

उद्धव ठाकरे महाराष्ट्र बंदची घोषणा करणार? बुलढाण्यातील घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बुलढाणा : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंद करण्याबाबत सूचक विधान केलं होतं. त्यानंतर आज बुलढाण्यात उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे खरंच महाराष्ट्र बंदची घोषणा करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. बुलढाणा येथे त्यांच्या शेतकऱ्यांसोबतचा संवाद आयोजित करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आलाय.

पाहा लाईव्ह कार्यक्रम :

या मेळाव्याला हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा हा शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री या कार्यक्रमात नेमकी काय घोषणा करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.