Buldana Crime | बायकोनं दुसऱ्याशी लग्न केले, तिच्यावर कारवाई करा; बुलडाण्यात चक्क नवरा बसला बायकोच्या विरोधात उपोषणाला

Buldana Crime | बायकोनं दुसऱ्याशी लग्न केले, तिच्यावर कारवाई करा; बुलडाण्यात चक्क नवरा बसला बायकोच्या विरोधात उपोषणाला
बुलडाण्यात चक्क नवरा बसला बायकोच्या विरोधात उपोषणाला
Image Credit source: tv 9

माहिती मिळाल्यानंतर मोबाईलवर संपर्क साधला. पण, पत्नी काही फोन उचलत नव्हती. त्यानंतर गणेश हे तिच्या माहेरी गेले. तीथंही ती हजर नव्हती. मुलीचा दुसरा विवाह करून दिल्याचं त्यांच्या सासरच्या लोकांनी सांगितलं.

गणेश सोळंकी

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 27, 2022 | 11:58 AM

बुलडाणा : घर, संसार म्हटल्यावर या ना त्या कारणाने घरात नवरा बायकोचे भांडणं (quarrel) होणारच. हा काही नवीन प्रकार नाही. मात्र, बायकोच्या विरोधात कुणी उपोषणाला बसले असेल तर… यापूर्वी तुम्ही ऐकले नसेल. मात्र बुलडाण्यात जिल्ह्यातील नांदुऱ्यात (Nandura) एक नवरोबा चक्क बायकोच्या विरोधात उपोषणाला (fast) बसला. त्याच्या बायकोने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले. त्यामुळेच तिच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या नवरोबाने पोलिसांकडे केलीय. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्याच्या राजनगर येथील गणेश वडोदे या नावरोबाने नांदुरा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना यापूर्वी निवेदन दिले होते.

पोलिसांना दिलेल्या निवेदनात काय

पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार, त्यांच्या पत्नीने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले. त्यामुळे तिच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी नांदुरा पोलिसांकडे केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे गणेश वडोदे यांनी 26 मेपासून नांदुराच्या तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. गणेश वडोदे असं या उपोषणकर्त्याचं नाव. आता पोलीस प्रशासन काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र नवऱ्याने बायोकोच्या विरोधात उपोषणाला बसल्याने चर्चा ही होत आहे.

रक्षाबंधनाला गेली ती परत आलीच नाही

नवरोबा गणेश हे मजुरी करतात. त्यांची पत्नी ही घरकाम करत होती. गणेशने दिलेल्या तक्रारीनुसार, पत्नीशी त्यांचे 2011 साली झाडेगाव येथे लग्न झालं. पत्नी तीन ऑगस्ट 2020 ला रक्षबंधनाला जात म्हणून मावसभावासोबत घरून निघून गेली. यानंतर ती परत आली नाही. घर परत ये म्हणून गणेशनं बरेचदा विनंती केली. पण, ती काही घरी आली नाही. 28 डिसेंबर 2021 रोजी तीनं दुसऱ्याशी विवाह केला. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर मोबाईलवर संपर्क साधला. पण, पत्नी काही फोन उचलत नव्हती. त्यानंतर गणेश हे तिच्या माहेरी गेले. तीथंही ती हजर नव्हती. मुलीचा दुसरा विवाह करून दिल्याचं त्यांच्या सासरच्या लोकांनी सांगितलं. मला घटस्पोट दिलेला नाही. मग, तीनं दुसरं लग्न कसं केलं, असा गणेशचा प्रश्न आहे. यासाठी त्याने आधी पोलिसांत तक्रार दिली. पण, काही होत नसल्याचं पाहून ते आता उपोषणाला बसलेत.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें