Nagpur Crime | धक्कादायक! व्यवसायासाठी घर गहाण ठेवले, कर्ज थकल्यानं बँकेचा तगादा, नागपुरात युवा व्यापाऱ्याची विहिरीत उडी

शुभमला बँकेच्या वसुली पथकाने दम दिला होता. काही दिवसांपूर्वी खापरखेडा परिसरातील खासगी डॉक्टरकडे गेला होता. बँकेचे कर्ज व वसुलीपथक धमकी देत असल्यामुळे आत्महत्येचा विचार त्याने डॉक्टरांना बोलून दाखविला. डॉक्टरांनी शुभमची समजूत काढली. आत्महत्या करण्यापूर्वी घरात एका बॅगमध्ये चिठ्ठी लिहून ठेवली.

Nagpur Crime | धक्कादायक! व्यवसायासाठी घर गहाण ठेवले, कर्ज थकल्यानं बँकेचा तगादा, नागपुरात युवा व्यापाऱ्याची विहिरीत उडी
खापरखेडा येथील मृतक शुभम मडावीImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 11:25 AM

नागपूर : खापरखेड्यातील (Khaparkheda) युवा व्यापार्‍याने बँकेतून कर्ज काढून व्यापार सुरू केला. हफ्ते फेडायला उशीर होत होता. वसुली पथकाने दम दिला. त्यामुळे तो डिफ्रेशनमध्ये गेला. जीवनाला कंटाळून तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोराडी पोलीस (Koradi Police) स्टेशन हद्दीत घडली. मृतक व्यापार्‍याचे नाव शुभम संजय मडावी (Shubham Madavi) (वय 25), रा. खापरखेडा असे आहे. शुभमचे दीड महिन्यापूर्वीच लग्न झाले. त्याचे वडील संजय मडावी उपहारगृहात खाद्यपदार्थ बनविण्याचे काम करीत होते. मात्र, त्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. खापरखेडा मुख्य बाजारपेठेत आलू-पोहा चन्याचे दुकान लावले. कामाचा व्याप वाढला. त्यामुळं शुभम व त्याच्या आईला सोबतीला घेतले. स्वत:चे घर बांधले. शुभमला या व्यवसायात रस नव्हता. त्याने घर बँकेत गहाण ठेवून कर्ज काढले. हायटेक कॅमेरे विकत घेऊन बाजारपेठेत फोटो स्टुडिओचे दुकान लावले.

दीड महिन्यांपूर्वी लग्न

शुभमने दीड महिन्यांपूर्वी लग्न केले. काही बँकेचे हप्ते थकीत राहिले. हप्ते वसूल करण्याचा तकादा बँकेच्या वसुली पथकाने लावला. शिवाय आठवड्यापूर्वी वसुली पथकातील एका सदस्याने त्याच्या दुकानात जाऊन दम दिला. त्यामुळे तो नैराशेत होता. मंगळवार, 24 मे रोजी सकाळपासून घराबाहेर पडला. बराच वेळ घरी परत आला नाही. बुधवारी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं?

शुभमला बँकेच्या वसुली पथकाने दम दिला होता. काही दिवसांपूर्वी खापरखेडा परिसरातील खासगी डॉक्टरकडे गेला होता. बँकेचे कर्ज व वसुलीपथक धमकी देत असल्यामुळे आत्महत्येचा विचार त्याने डॉक्टरांना बोलून दाखविला. डॉक्टरांनी शुभमची समजूत काढली. आत्महत्या करण्यापूर्वी घरात एका बॅगमध्ये चिठ्ठी लिहून ठेवली. घरात शुभमच्या मोबाईलचा शोध घेत असता त्या बॅगमध्ये शुभमच्या पत्नीला चिठ्ठी आढळली. चिठ्ठीत आत्महत्या करण्यासाठी कारणीभूत असलेल्या वसुली पथकातील एका सरदारच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.