पुण्यात सार्वजनिक जागेत फटाके फोडण्यास मनाई, आरोग्यदायी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

एकीकडे गणेशोत्सवात पुण्यातील विद्यानंद बापट यांनी प्रदुषणमुक्त सण साजरे करण्यावरुन आवाज उठवत आंदोलन सुरु केले असताना आता पुणे महानगर पालिकेनेच आता नागरिकांना सार्वजनिक जागेत फटाके फोडण्यास मनाई केली आहे.

पुण्यात सार्वजनिक जागेत फटाके फोडण्यास मनाई, आरोग्यदायी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
pune municipal corporation ban on fire crackers
| Updated on: Nov 06, 2026 | 8:49 PM

दिवाळी आणि सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे फटाके आणि ध्वनिप्रदूषणाबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. दिवाळी सण आणि जोडून आलेल्या सणासुदीच्या निमित्ताने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास प्रतिबंध केले आहे. यात सार्वजनिक रस्ते, चौक, गल्ली, पदपथ, उद्याने आणि टेरेसवर फटाके फोडू नयेत असे आवाहन पुणे महानगर पालिकेने केले आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये आणि शांतता क्षेत्रांमध्ये फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

पुण्यात आता ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ध्वनिप्रदूषण ( नियमन आणि नियंत्रण ) नियम २००० मधील तरतुदींचे पालन करण्याचे निर्देश नागरिकांना दिले आहेत असे पुणे महानगर पालिकेने म्हटले आहे. फटाके आणि ध्वनिवर्धक यंत्रणेमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करण्याचे आवाहन पुणे महानगर पालिकेने केले आहे.

Loading...

फटाक्यांच्या वापरामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रचलित कायदे आणि नियमांनुसार कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने केला आहे. ध्वनी आणि वायुप्रदूषणासंदर्भात तक्रारींसाठी महापालिकेकडून हेल्पलाइन क्रमांक आणि टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणेकरांना स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us