आहेर नको, सुजयला मत द्या, नगरमधील शेख कुटुंबाचं लग्नपत्रिकेतून आवाहन

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे अहमदनगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी एक तरुणाने त्याच्या लग्नपत्रिकेतून मतं देण्याची मागणी केली आहे. लग्नात आहेर नको, पण सुजयला मत द्या, असं स्पष्टपणे शेख कुटुंबाने पत्रिकेत सर्वात शेवटी लिहिलं आहे. ही पत्रिका सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. पारनरे तालुक्यातील निघोजच्या फिरोज शेख या तरुणाने त्याच्या लग्न पत्रिकेतून सुजय …

आहेर नको, सुजयला मत द्या, नगरमधील शेख कुटुंबाचं लग्नपत्रिकेतून आवाहन

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे अहमदनगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी एक तरुणाने त्याच्या लग्नपत्रिकेतून मतं देण्याची मागणी केली आहे. लग्नात आहेर नको, पण सुजयला मत द्या, असं स्पष्टपणे शेख कुटुंबाने पत्रिकेत सर्वात शेवटी लिहिलं आहे. ही पत्रिका सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.

पारनरे तालुक्यातील निघोजच्या फिरोज शेख या तरुणाने त्याच्या लग्न पत्रिकेतून सुजय विखेंसाठी मतं मागितली आहेत. 31 मार्च रोजी फिरोज आणि मोसिना या उच्चशिक्षीत जोडप्याचं लग्न होणार आहे.

अहमदनगरमध्ये सुजय विखेंनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांनी आज सुरेश अण्णाजी तथा नाना जाधव यांची घेतली भेट. जाधव हे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघ चालक असून सुजय विखे भाजपासह संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. सुजय विखेंचा प्रचार सध्या शिगेला पोहचलाय. जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जाऊन ते मतदारांशी संवाद साधत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *