पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, त्या तिघांवर गुन्हा दाखल

पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनी जमीन घोटाळा प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सरकारने दिल्याने खळबळ उडाली आहे.

पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, त्या तिघांवर गुन्हा दाखल
parth pawar and ajit pawar
Updated on: Nov 06, 2025 | 10:54 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील जमीन खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप होत असताना आता या व्यवहारातील तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने १८०० कोटीची ही जमीन अवघ्या ३०० कोटीत खरेदी केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात मुद्रांक शुल्क ( स्टँप ड्युटी ) म्हणून ५०० रुपये भरल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.  या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी पुण्याचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. आता या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अजितदादा यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील जमीन खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप होत आहे.या प्रकरणात १८०० कोटी रुपयांची सरकारी जमीन ३०० कोटीत खरेदी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात दिग्विजय पाटील, कुलमुखत्यार शीतल तेजवणी,सब रजिस्टर रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात या जमीनीच्या व्यवहारात स्टॅम्प ड्युटी कमी करण्यासाठी अर्ज केला होता,मात्र अर्जावर सुनावणी होण्याआधीच स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आणि जमीन खरेदी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

येथे पोस्ट पाहा –

कोरेगाव पार्कमधील मोक्याची ४० एकर जागा

पुण्यातील कोरेगाव पार्कमधील मोक्याची ४० एकर जागा बेकायदेशीरपणे व्यवहार करुन मूळ मालक आणि सरकारची फसवणूक करीत पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीने खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुद्रांक शुल्क विभागाने पुण्यातील उपनिंबधक रवींद्र तारु यांनी निलंबित केले होते. पुण्याच्या जमीन घोटाळ्यात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात येणार आहे.या प्रकरणात पुण्याचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

येथे पोस्ट पाहा –