जितेंद्र आव्हाडांच्या पाच कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल, गणपती मंदिरात आरती करणं भोवलं

| Updated on: Jul 21, 2021 | 3:11 PM

दरम्यान आव्हाड यांना सरकार पाठीशी घालत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी कार्यकर्त्यांचा बळी दिल्याचा आरोप भाजपाने केलाय.

जितेंद्र आव्हाडांच्या पाच कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल, गणपती मंदिरात आरती करणं भोवलं
JITENDRA AWHAD
Follow us on

नाशिक : नाशिकमध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पाच कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवश्या गणपती मंदिरात कोरोना नियम धाब्यावर बसवत आरती केल्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत आलेल्या पाच कार्यकर्त्यांसह विश्वस्तांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. दरम्यान आव्हाड यांना सरकार पाठीशी घालत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी कार्यकर्त्यांचा बळी दिल्याचा आरोप भाजपाने केलाय.

आव्हाड यांनी आरती करत थेट प्रशासनालाच आव्हान दिलं होतं

नाशिकच्या नवश्या गणपती मंदिरात कोरोना नियम धाब्यावर बसवून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आरती करत थेट प्रशासनालाच आव्हान दिलं होतं. आव्हाडांच्या या कृत्याननंतर त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी त्यांच्याबरोबर आलेल्या पाच कार्यकर्त्यांसह मंदिराच्या विश्वस्तांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी पाच जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय.

आव्हाड यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा भाजपचा आरोप

दरम्यान, कोरोनाचे नियम डावलून आरती करणाऱ्या मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सरकार पाठीशी घालत असून, त्यांच्या कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असल्याचा आरोप भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केलाय. नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी आव्हाड यांच्यासोबत आलेल्या पाच कार्यकर्त्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 269, 270, 188 या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, लवकरच त्यांना अटक केली जाणार आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. मात्र आव्हाडांच्या कृत्याची शिक्षा कार्यकर्त्यांना देऊन एक प्रकारे सरकारने आव्हाडांना अभय दिल्याची चर्चा आहे.

जितेंद्र आव्हाडांविरोधात शिवसेनेच्या बड्या नेत्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

तर गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदारांनी जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार करण्यात आली होती.  जितेंद्र आव्हाडांच्या कार्यशैलीवर शिवसेना नेते, आमदार आणि मंत्री नाराज आहेत. यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी आमदार विनोद घोसाळकर,राहुल शेवाळे, सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. याआधी आमदार अजय चौधरी यांनीदेखील तक्रार केली होती.

संबंधित बातम्या :

कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांसाठी द्यायच्या घरांचं काय झालं?, आव्हाड भेटीला येताच शरद पवारांचा पहिला सवाल

थँक्यू आव्हाडसाहेब, टाटा कॅन्सर सेंटरला म्हाडाकडून 100 फ्लॅट्स

case was filed against Jitendra Awhad activist, and he was about to perform Aarti in Ganpati temple