CBSE SSC and HSC Exam Time Table : मोठी बातमी! सीबीएसईच्या 10 वी आणि 12वी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; या तारखेपासून परीक्षा सुरू

मोठी बातमी! सीबीएसईच्या 10 वी आणि 12वी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; या तारखेपासून परीक्षा सुरू

CBSE SSC and HSC Exam Time Table : मोठी बातमी! सीबीएसईच्या 10 वी आणि 12वी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; या तारखेपासून परीक्षा सुरू
cbse hsc and ssc exam time table
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2026 | 7:56 PM
CBSE HSC And SSC Board Exam Time Table : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. सीबीएसईने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, यंदाच्या दोन्ही कक्षांच्या बोर्ड परीक्षा 16 फेब्रुवारी 2027 (मंगळवार) पासून सुरू होणार आहेत. परीक्षा सुरू होण्याच्या तब्बल 101 दिवस आधी ही डेटशीट प्रसिद्ध करण्यात आली असून, यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे. यंदा इयत्ता 10 वीच्या परीक्षेत 83 विषयांचे आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षेत 121 विषयांचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तसेच, या परीक्षांमध्ये देशभरातून आणि परदेशातून 10 वीचे 26.5 लाखांहून अधिक आणि 12 वीचे 19.8 लाखांहून अधिक म्हणजेच एकूण 46 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. सर्व परीक्षा सकाळी 10:30 वाजता (IST) सुरू होणार आहेत.
Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us