
एका तेरा मजल्याच्या इमारतीवरील तिसऱ्या मजल्यावरुन एक दोन वर्षांचे बालक अचानक खाली कोसळले. त्याला कोसळताना पाहून एका तरुणाने प्रसंगावधान दाखविले आणि झेप घेतली. या मुलाला तरुणाला झेलता आले नाही. परंतू त्याच्या हाताला लागून हा मुलगा खाली पडल्याने मुलाला किरकोळ खरचटण्या पालिकडे काही झाले नाही. अशी थरारक घटना डोंबिवलीतील देवीचा पाडा येथे घडली आहे. हा सारा घटनाक्रम सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. चला तर पाहूयात काय नेमका प्रकार घडला आहे.
एका 13 मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोन वर्षीय चिमुरडा खेळतान अचानक खाली कोसळल्याची घटना घडली आहे. हा चिमुरडा खाली पडताना दिसताच इमारतीत राहणाऱ्या भावेश म्हात्रे नावाच्या तरुणाने जीवाची पर्वा न करता चिमुरड्याला वाचवण्यासाठी त्याला झेलण्याचा प्रयत्न केला. हा चिमुरडा त्यांच्या हाताला लागून नंतर खाली जमिनीवर पडल्याने त्याला कोणतीही मोठी दुखापत न होता त्याचे प्राण बचावल्याची घटना घडल्याने. हा तरुण देवासारख्या त्याच्या मदतीला धावून आल्याचे म्हटले जात आहे. या घटनेत “देव तारी त्याला कोण मारी”चा प्रत्यय आला आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
तेरा मजली इमारतवरून चिमुकला कोसळला, तरूणाच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचला, डोंबिवलीतील व्हिडिओ व्हायरल @mumbaimatterz @AmhiDombivlikar @TV9Marathi pic.twitter.com/KJRtBzCE1u
— Atul B. Kamble (@atulkamble123) January 26, 2025
डोंबिवलीतील देवीचापाडा परिसरात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. एका 13 मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडणाऱ्या या दोन वर्षांच्या चिमुरड्याचा जीव भावेश म्हात्रे या तरुणाच्या धाडसामुळे वाचला. चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता भावेशने केलेल्या प्रयत्नाची घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शनिवार 25 जानेवारी रोजी दुपारी 1. 49 वाजता डोंबिवलीतील गावदेवी मंदिराजवळील देवीचापाडा येथील अनुराज हाईट्स टॉवर या 13 मजली इमारतीतून तिसऱ्या मजल्यावरून एका दोन वर्षाच्या चिमुरड्याचा तोल गेल्याने तो खाली कोसळला. त्याचवेळी इमारतीतून बाहेर पडलेल्या भावेश एकनाथ म्हात्रे या तरुणाने चिमुरड्याला खाली पडताना पाहिले. या तरुणाने प्रसंगावधान राखत त्यांनी लगेच धाव घेतली. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने चिमुरड्याला झेलण्याचा प्रयत्न केला. परंतू अंदान न आल्याने चिमुरडा हातातून सरकत पायावर पडला. परंतु त्यामुळे थेट जमीनीवर पडण्याने होणारी मोठी हानी टळली आणि त्या चिमुकल्याचे प्राण वाचले. ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भावेश म्हात्रे यांच्या प्रसंगावधानाने एका लहान बाळाचा जीव वाचला. भावेश म्हात्रे यांच्या कृतीमुळे “देव तारी त्याला कोण मारी” ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे.