AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅस सिलिंडरबाबत मोठा निर्णय; सरकार लॉन्च करणार…देशातील लाखो लोकांवर काय परिणाम पडणार?

सध्या बाजारात 19 किलो, 5 किलो, 2 किलो अशा प्रकारात व्यावसायिक गॅस सिलिंडर अपलब्ध आहेत. यातील 19 किलोचा गॅस सिलिंडर वजनाने खूप जड असतो. त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

गॅस सिलिंडरबाबत मोठा निर्णय; सरकार लॉन्च करणार...देशातील लाखो लोकांवर काय परिणाम पडणार?
gas cylinder new ruleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 13, 2026 | 3:51 PM
Share

Gas Cylinder New Rules : गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या नागरिकांना तसेच व्यावसायिकांना लवकर गॅस सिलिंडर मिळावा आणि गॅस सिलिंडरचे वितरण सोपे आणि सहज कसे होईल, यासाठी नेहमीच वेगवेगळे प्रयत्न केले जाता. इराण-अमेरिका युद्धामुळे गेल्या काही महिन्यात गॅस सिलिंडरच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला. गॅस सिलिंडरचा भावही वाढला. बुकिंग करूनही लोकांना कित्येक दिवस गॅस सिलिंडर मिळत नव्हता. आता पुरवठा साखळी सुरळीत झाली आहे. दरम्यान, आता याच गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत मोठा निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय अमलात आला तर छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या सामान्यांच्या डोक्याचे टेन्शनच मिटू शकते.

नेमका काय निर्णय घेतला जातोय?

मिळालेल्या माहितीनुसार लवकरच छोटे व्यावसायिक, स्ट्रिट फूड विक्रेते, विद्यार्थी, भाड्याने राहणारे लोक, प्रवासी मजूर यांच्यासाठी स्वयंपाकासाठी गॅस खरेदी करणे आणखी सोपे होणार आहे. कारण इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या शासकीय कंपन्या लवकच 10 किलो वजन असणारा गॅस सिलिंडर लॉन्च करण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा फायदा घरगुती गॅस सिलिंडर वापरणारे तसेच व्यावसायिक सिलिंडर वापरणारे अशा दोघांनाही होणार आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास देशातील लाखो लोकांना याचा फायदा मिळेल. अनेकांना 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर वाहून नेण्यास अनेक अडचणी येतात.

10 किलोच्या सिलिंडरची विशेषता काय?

सध्या बाजारात 19 किलो, 5 किलो, 2 किलो अशा प्रकारात व्यावसायिक गॅस सिलिंडर अपलब्ध आहेत. यातील 19 किलोचा गॅस सिलिंडर वजनाने खूप जड असतो. त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच चहाची दुकाने, चोटे फूड स्टॉल, विद्यार्थी, भाड्याने राहणारे लोक छोट्या आणि कमी वजनाच्या गॅस सिलिंडरची मागणी करत होते. त्यामुळे आता 10 किलोचे कम्पोझिट गॅस सिलिंडर लॉन्च करण्यावर विचार केला जातोय.

मिळालेल्या माहितीनुसार हा नवा सिलिंडर हाय डेनसिटी पॉलिएथिलीनपासून तयार करण्यात येईल. पारंपरिक गॅस सिलिंडरच्या तुलनेत हा नवा गॅस सिलिंडर 50 टक्क्यांनी हालका असेल. त्याचा फायदा अनेकांना होईल.

Follow Us
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप