माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांनी तपासणी करुन घ्या : चंद्रकांत खैरे

| Updated on: Dec 09, 2020 | 6:14 PM

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना कोरोनाची लागण झाली आहे (Chandrakant Khaire tested Corona Positive).

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांनी तपासणी करुन घ्या : चंद्रकांत खैरे
Follow us on

औरंगाबाद : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना कोरोनाची लागण झाली आहे. खैरे यांनी स्वत: याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. चंद्रकांत खैरे यांना औरंगाबाद येथील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून खबरदारी म्हणून त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे (Chandrakant Khaire tested Corona Positive).

चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणाले?

“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी. माझी प्रकृती ठीक आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटल येथे दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल. जय महाराष्ट्र!”, असं चंद्रकांत खैरे ट्विटरवर म्हणाले आहेत (Chandrakant Khaire tested Corona Positive).

राज्यातील दिग्गज नेत्यांना कोरोना

कोरोनाचा कहर अद्यापही सुरु आहे. कोरोनाने सर्वसामान्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत कुणालाही सोडलं नाही. आतापर्यंत राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राज्यातील अनेक आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. राज्याचे उपुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. या तीनही नेत्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. दरम्यान, देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांनीदेखील आता कोरोनावर मात केली आहे.

हेही वाचा : फडणवीससाहेब, काळजी घ्या आणि कोरोनावर मात करा, रोहित पवारांकडून सदिच्छा