‘आम्हाला तुम्ही शिकवू नका, शरजीलवर कारवाई करणार का? ते सांगा’, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल

| Updated on: Feb 03, 2021 | 5:32 PM

हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानी याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आक्रमक झाले आहेत (Chandrakant Patil letter to Yogi Adityanath)

आम्हाला तुम्ही शिकवू नका, शरजीलवर कारवाई करणार का? ते सांगा, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल
चंद्रकांत पाटील
Follow us on

पुणे : हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानी याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना याबाबत पत्र लिहित शरजीलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार शरजीलवर कारवाई कधी करणार? असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत केला (Chandrakant Patil letter to Yogi Adityanath).

“शरजीलवर कारवाई करायला उशिर का होतोय? खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही आणखी कोणत्या गोष्टींची तडजोड करणार आहात? यावर तुम्ही टीप्पणी कराल, यांच्याकडे सरकार नाही तर झोप लागत नाही. आमचे अतिशय उत्तम कामे चाचली आहेत. व्यवस्थित सेवा, आंदोलने सुरु आहेत. तुम्ही आम्हाला शिकवू नका. दरवेळी सरकार नाही म्हणून झोप येत नाही, असं गुळगुळीत वाक्य म्हणू नका. कारवाई करणार की नाही ते सांगा”, असं चंद्रकांत पाटील ठणकावून म्हणाले आहेत.

“हिंदू समाज संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात मोठ्या संख्येत आहे. कुणीतरी एक मुलगा येऊन काहितरी बोलून जातो. त्यावर समाजाने कारवाई करावी, अशी सरकारची अपेक्षा आहे का? याप्रकरणी गेल्या पाच दिवसांपासून काहीच कारवाई झालेली नाही. आम्ही कायद्या बाहेरील कारवाई मागत नाहीत. पण कायद्याअंतर्गत कोणतीही कारवाई झालेली नाही. शरजील उस्मानी हा मूळ उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारला आम्ही पत्र लिहिलं आहे. आम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवले आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले (Chandrakant Patil letter to Yogi Adityanath).

चंद्रकांत पाटील यांचं योगींना पत्र

‘अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने 30 जानेवारी 2021 रोजी पुण्यातील एल्गार परिषदेत बोलताना हिंदू समाजाबाबत अत्यंत अपमानकारक भाषा वापरली आहे. ‘आजचा हिंदू समाज सडला आहे’, अशा वाक्यांचा त्यात समावेश आहे. त्याने समाजात तेढ निर्माण करण्याच्या भावनेतूनच अशा प्रकारची भाषा वारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाच्या संविधानिक संस्थांविरोधातील ही भाषा म्हणजे राष्ट्रद्रोहापेक्षा कमी नाही. त्याच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हिंदू समाजाच्या भावनांना ठेस पोहोचली आहे’, असं पत्र चंद्रकात पाटील यांनी योगी आदित्यनाथांना पाठवलं आहे.

चंद्रकांत पाटलांच्या पत्राला शिवसेनेकडून उत्तर

योगींना पाठवलेल्या पत्रावरुन शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. अशाप्रकारे हिंदूविरोधी वक्तव्य जर कुणी करत असेल तर त्याच्या विरोधात कारवाई केली जाईल. त्याचा तपासही सुरु करण्यात आला आहे. पण विरोधकांनी हा मुद्दा केल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार

‘शिवसेना सत्तेसाठी मिंधी, कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन’, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

एल्गारवर राष्ट्रवादीची भूमिका बदलतेय? आव्हाड म्हणतात, त्या वक्तव्याची चौकशी कराच!