राज्यात रक्ताचा तुटवडा पण ‘हा’ जिल्हा रक्तदात्यांच्या दातृत्वामुळे स्वयंपूर्ण

Yuvraj Jadhav

|

Updated on: Dec 14, 2020 | 3:31 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याचे जाहीर केले होते. Chandrapur sufficient Blood storage

राज्यात रक्ताचा तुटवडा पण 'हा' जिल्हा रक्तदात्यांच्या दातृत्वामुळे स्वयंपूर्ण

चंद्रपूर: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याचे जाहीर केले होते. यासाठी त्यांनी रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा असला तरी चंद्रपूर रक्ताच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रक्तसाठा उपल्बध आहे. जिल्ह्यात रक्ताची मुबलकता पाहायला मिळते त्याचं कारण चंद्रपूर जिल्ह्यातील रक्तदाते आहेत.(Chandrapur sufficient Blood storage)

राज्यात रक्ताचा तुटवडा मात्र चंद्रपुरात मुबलकता

राजकीय पक्षांकडून काही प्रमाणात रक्तदान शिबिरांचं योजन करण्यात आलं होते. राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शिबिंरांचे आयोजन झाले. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात रक्ताचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.रक्तदात्यांनी केलेल्या उत्स्फूर्त रक्तदानामुळं हा जिल्हा रक्ताच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. आपत्कालीन स्थितीत इतर जिल्ह्यांना सुद्धा पुरवठा करण्याची क्षमता चंद्रपूरमधील रक्तपेढयांमध्ये आहे. जिल्ह्यात महिन्याला सुमारे 1200 बॉटल रक्तदान होते.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर समाजातून मोठ्या प्रमाणात रक्तदाते पुढे आले. राजकीय पक्षांनीही यात मोलाची मदत केली. त्यामुळं यावर्षभरात 269 शिबीर घेतली गेली. रुग्णांना रक्त किंवा प्लाजमा या दोन्हींची गरज वेळीच भागवली गेली. कोरोना काळ असल्यानं गंभीर रुग्णांना प्लाजमा थेरेपी आवश्यक असल्यानं 15 रुग्णांना ते देण्यात आलं. (Chandrapur sufficient Blood storage)

चंद्रपूरमध्ये दिवसाला 50 जणांचे रक्तदान

जिल्ह्यात रोज किमान 50 बॉटल रक्त गोळा होत आहे. महिन्याला सुमारे 1200 बॉटल रक्त मिळत आहे. कोरोना रुग्णांना अपेक्षेप्रमाणे रक्ताची गरज पडलेली नाही. पण, येत्या काळात केव्हाही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, हा विचार करून तशी व्यवस्था शासकीय रक्तपेढीनं करून ठेवली आहे. रक्ताच्या बाबतीत जिल्ह्याची स्थिती सुदृढ असल्यानं गरजेच्या वेळी गडचिरोली आणि अहेरी उपविभागाला इथून रक्त पुरवठा केला जातो. (Chandrapur sufficient Blood storage)

राज्यात आजघडीला रक्ताचा तुटवडा असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत कुठं आणीबाणीची असेल, तर इथून पुरवठा करण्याची तयारीही इथल्या वैद्यकीय यंत्रणेची आहे. ही स्वयंपूर्णता केवळ इथल्या सेवाभावी रक्तदात्यांमुळं येऊ शकली. त्यामुळं रक्तदानाची चळवळ अधिक सशक्त करणं गरजेचं झालं आहे, असं चंद्रपूरच्या वैदकीय महाविद्यालयातील रक्तपेढी प्रमुख डॉ.अनंत हजारेंनी सांगितले. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व रक्तदात्यांचे आभार मानले आहेत. (Chandrapur sufficient Blood storage)

संंबंधित बातम्या:

राज्यात रक्ताची टंचाई, जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

राज्यात आठवडाभर पुरेसाच रक्तसाठा, मंत्री राजेंद्र शिंगणेंकडून रक्तदानाचे आवाहन

(Chandrapur sufficient Blood storage)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI