जुनी पेन्शन आंदोलनात विश्वासघात; म्हणून कर्मचाऱ्यांनी थेट यांच्या फोटोला जोडे हाणले…

| Updated on: Mar 23, 2023 | 9:26 PM

चंद्रपूर जिल्ह्यातील कर्मचारी आक्रमक होत आता जोडे मारो आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजनेसाठीच्या या जोडो मारो आंदोलनामुळे हे आंदोलन आणखी तापणार असल्याचे चित्र दिसत आहे.

जुनी पेन्शन आंदोलनात विश्वासघात; म्हणून कर्मचाऱ्यांनी थेट यांच्या फोटोला जोडे हाणले...
Follow us on

चंद्रपूर : जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी 14 मार्च पासून बेमुदत आंदोलन पुकारले होते. त्यानंतर काही दिवसांनी हे आंदोलन मागे घेत असल्याचे कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने जाहीर केले. त्यानंतर आंदोलन मागेही घेण्यात आले. तर त्यानंतर मध्यवर्ती संघटनेचा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे सांगत काही जिल्ह्यातून आंदोलन शासकीय कर्मचाऱ्यांनी आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा सरकारला दिला आहे. काही जिल्ह्यातून असे आंदोलन पुकारण्यात आल्यानंतर आंदोलनात फूट पडल्याचे जाहीर झाले होते.

तर त्याच मुद्यावरून चंद्रपूर जिल्ह्यातील कर्मचारी आक्रमक होत आता जोडे मारो आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजनेसाठीच्या या जोडो मारो आंदोलनामुळे हे आंदोलन आणखी तापणार असल्याचे चित्र दिसत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात राज्य कर्मचारी संघटनेचे प्रमुख विश्वास काटकर यांच्याविरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे. यावेळी काटकर यांच्या फोटोला जोडे मारून कर्मचाऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.यावेळी काटकर यांचा निषेधही व्यक्त करण्यात आला आहे. विश्वासात न घेता संप मागे घेत 18 लाख कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केल्याचा काटकर यांच्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेतल्यामुळे संघटनेत फूड पडल्याचे चित्र समोर आले होते. तर आता शासकीय कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे आज ब्रम्हपुरी शहरात त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी निषेध म्हणून कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयात त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले.

इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता संप मागे घेतला आणि 18 लाख कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केल्याचा काटकर यांच्यावर कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन केल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.