AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrashekhar Bawankule : ‘माझ्याबद्दल वाईट बोलून माझ्या शरीरावर, चेहऱ्यावर..’ चंद्रशेखर बावनकुळे भावूक, जरांगे पाटलांकडून सातत्याने होतेय टीका

Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज पत्रकार परिषदेत भावूक झाले. सध्या त्यांच्यावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने टीका सुरु आहे.

Chandrashekhar Bawankule : 'माझ्याबद्दल वाईट बोलून माझ्या शरीरावर, चेहऱ्यावर..' चंद्रशेखर बावनकुळे भावूक, जरांगे पाटलांकडून सातत्याने होतेय टीका
Chandrashekhar Bawankule-manoj jarange patil
| Updated on: Aug 13, 2026 | 6:30 PM
Share

मागच्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील सातत्याने चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत आहेत. जरांगे पाटील यांच्याकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मनाला लागेल अशी टीका सुरु आहे. जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने सुरु असलेल्या टीकेवर आज चंद्रशेखर बावनकुळे बोलले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज पत्रकार परिषदेत भावूक झाले. मलाही कुटुंब असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकेचा सपाटा लावला आहे. “माझ्याबद्दल व्यंग करुन, माझ्याबद्दल वाईट बोलून माझ्या शरीरावर, चेहऱ्यावर टीका करुन त्यांना आनंद मिळत आहे. यातून त्यांच्या समाजाला न्याय मिळणार असेल तर नक्कीच त्यांनी माझी टिंगलटवाळी करावी” असं चंद्रशेखर बावनकुळे बोलले.

“मी कधी वाईट वागलो नाही. जातीभेद केला नाही. मराठा ओबीसी वादात पडलो नाही. माझ्याबद्दल गैरसमज झाला असेल, महसूल खात्याने इतकं काम काम केल्यानंतर व्यंग होत असेल तर त्याला अर्थ नाही” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. “माझही कुटुंब आहे. माझी पत्नी कुणबी आहे, सूनबाई मराठा आहे” असं बावनकुळे यांनी सांगितलं.

‘बावनकुळे तुम्ही पाप केलं’

“चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी रद्द करण्यात आल्या” असा आरोप सातत्याने मनोज जरांगे पाटील करतायत.”मंत्र्यांचं ऐकून कोणत्याही अधिकाऱ्याने त्याची प्रतिष्ठा पणाला लावू नये. अन्यथा तुम्हाला तुरुंगात जावं लागेल” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. “चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी रद्द करण्यात आल्या” असा सातत्याने आरोप केला.

“बावनकुळे हा माणूस फार विचित्र दिसतोय. बावनकुळे तुम्ही पाप केलं आहे. तुम्हाला आता ते भोगावंच लागणार आहे. तुम्ही मराठ्यावर अन्याय केला आहे” अशी बोचरी टीका मनोज जरांगे यांनी केली. मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांनी सातत्याने राजकीय नेत्यांना टार्गेट केलं.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच