AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 1000 मुलींना सुकन्या समृद्धी योजनेच्या धनादेशांचं वाटप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज एक हजार मुलींना सुकन्या समृद्धी योजनेच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं आहे.  या हजार मुलींच्या बँक खात्यावर आता दरवर्षी वीस हजार रुपये जमा होणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 1000 मुलींना सुकन्या समृद्धी योजनेच्या धनादेशांचं वाटप
devendra fadnavisImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 31, 2026 | 4:37 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज एक हजार मुलींना सुकन्या समृद्धी योजनेच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं आहे.  या हजार मुलींच्या बँक खात्यावर आता दरवर्षी वीस हजार रुपये जमा होणार आहेत. हे पैसे पुढील सलग दहा वर्ष सरकारच्या वतीने जमा केले जाणार आहेत.  सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत एक हजार मुलींचं बँक खातं सुरू करण्यात आलं आहे, आजचा कार्यक्रम म्हणजे नव्या युगाची सुरुवात आहे.  २०१४ ला मोदी पंतप्रधान झाले तेंव्हा बेटी बचाव बेटी पढाव हा विचार त्यांनी दिला,  मधल्या काळात स्त्री भ्रूण हत्येच्या घटना घडल्या, मुली ओझं वाटू लागल्या. त्या दुष्परिणामाचा सामना आता करावा लागत आहे.  विकसीत भारताचं स्वप्न पाहिलं तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले होते, ज्या देशाने प्रगती केली त्या प्रगतीमध्ये महिलांचा 50 टक्के वाटा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना फडणवीस यांनी दिली आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

आजचा कार्यक्रम म्हणजे नव्या युगाची सुरुवात आहे.  २०१४ ला मोदी पंतप्रधान झाले तेंव्हा बेटी बचाव बेटी पढाव हा विचार त्यांनी दिला,  मधल्या काळात स्त्री भ्रूण हत्येच्या घटना घडल्या, मुली ओझं वाटू लागल्या. त्या दुष्परिणामाचा सामना आता करावा लागत आहे.  विकसित भारताचे स्वप्न पाहिलं तेंव्हा मोदी म्हणाले होते, ज्या देशाने प्रगती केली त्या देशाच्या विकासात ५० टक्के महिलांचा वाटा आहे. स्त्रीयांना असमानतेची वागणूक दिल्यामुळे आपला देश एक हजार वर्ष पारतंत्र्यात राहिला, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी काही योजना सुरु केल्या आहेत. मुलींचे बचत खाते उघडले त्यात आपण पैसे टाकले साडेआठ टक्के व्याज त्यावर मिळणार आहे. या पैशांना कुठलाही टॅक्स लागणार नाहीये. मुलगी 18 वर्षांची झाली की ते पैसे तिला मिळणार आहेत. पाश्चिमात्य विचारांपेक्षा भारताची संस्कृती वेगळी आहे, विचार वेगळा आहे.  जिसमे ताकद होगी वो बचेगा, हा पाश्चिमात्य विचार आहे,  मात्र भारतात हा विचार नाही, जो जन्मला आला तो जगणार आणि त्याला जगण्याचा अधिकार आहे, अशी भारताची संस्कृती आहे, विचार आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा