Nashik | 36 कोटींचा निधी 800 कोटीपर्यंत आणला; भुजबळांचा दावा, उदघाटनांचा धडाका!

| Updated on: Jan 24, 2022 | 3:59 PM

नाशिक जिल्ह्यातील नागडेगाव येथे आमदारांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत महादेव मंदिरासमोरील सभा मंडपासाठी 10 लाख रुपये आणि लक्ष्मी आई मंदिरसमोरील सभा मंडपासाठी 10 लाख रुपये निधीच्या कामाचे उद्घाटन छगन भुजबळ यांनी केले.

Nashik | 36 कोटींचा निधी 800 कोटीपर्यंत आणला; भुजबळांचा दावा, उदघाटनांचा धडाका!
नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण करण्यात आले.
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्यात सगळीकडे कोरोनाचा (Corona) प्रसार होत आहे. नागरिकांनी या आजारापासून स्वतःचा व इतरांचा बचाव करण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. लसीकरणाच्या माध्यमातून या आजाराची जोखीम कमी करावी, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी येवला तालुक्यातील नागडे आणि सायगाव येथील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करताना केला. शिवाय 2004 साली मी आलो तेव्हा जिल्ह्याला 36 कोटी निधी येत होता. आज तो निधी 800 कोटीपर्यंत आणल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

या कामांचा धडाका

नागडेगाव येथे आमदारांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत महादेव मंदिरासमोरील सभा मंडपासाठी 10 लाख रुपये आणि लक्ष्मी आई मंदिरसमोरील सभा मंडपासाठी 10 लाख रुपये निधीच्या कामाचे उद्घाटन छगन भुजबळ यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सायगाव येथे समाज कल्याण योजनेतून सुशोभिकरण 15 लाख रुपये, प्रमुख जिल्हा मार्ग 65 व रस्ता कॉक्रीटीकरण 50 लाख, आण्णाभाऊ साठे नगर व आंबेडकर नगर विकास योजना अंतर्गतपूरक पाणीपुरवठा योजना 17 लाख रुपये, सायगाव ते रामवाडी जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्याचे काम 15 लाख रुपये, 15 व्या वित्त आयोग अंतर्गत शौचालय बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन 3 कोटी 65 लाख रुपये याकामांचे भूमिपूजन आणि 15 व्या वित्त आयोग अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत सोलर युनिट बसवणे 2 लाख रुपये, 15 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत हद्दीत पाण्याचे नळाला मीटर बसविण्यासाठी 10 लाख रुपये, आमदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सौरदीप बविण्यासाठी 6 लाख रुपये, मुलभूत सुविधा अंतर्गत दत्तवाडी येथे सभा मंडपासाठी 15 लाख रुपये, जिल्हा परिषद शाळा सायगाव प्रोजेक्टर उद्घाटन 65 लाख रुपये या कामांचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

पाटोदा येथे ही कामे होणार

जनसुविधा अंतर्गत व लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालय इमारत 25 लाख रुपये, मुलभूत सुविधा अंतर्गत काटे मारुती सभामंडप 10 लाख रुपये, मुलभूत सुविधा अंतर्गत दहेगांव-पाटोदा सभामंडप 15 लाख रुपये, 14 व्या वित्त आयोगांतर्गत ग्राम पंचायत कार्यालय समोर रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी 10 लाख रुपये, 14 व्या वित्त आयोग अंतर्गत प्राथमिक शाळेस संरक्षण भिंत बांधकाम 10 लाख रुपये, नागरी सुविधा अंतर्गत स्ट्रीट लाईट 10 लाख रुपये, अल्पसंख्यांक विकास योजना अंतर्गत मुस्लीम भागात शादी खाना बांधकाम 7 लाख रुपये, जिल्हा परिषद अंतर्गत पशू वैद्यकीय दवाखाना बांधकाम 30 लाख रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्य इमारत 3 कोटी 55 लाख रुपये या कामांचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

देवगाव येथे ही कामे होणार

जनसुविधा योजने अंतर्गत नवीन ग्राम पंचायत कार्यालय इमारत 12 लाख रुपये, देवगाव-कोळगाव रस्ता डांबरीकरण 10 लाख रुपये, देवगाव-मानोरी रस्ता दुरुस्ती करणे 15 लाख रुपये, ग्रामीण क्षेत्र विकास निधी अंतर्गत देवी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे 5 लाख रुपये, नागरी सुविधा योजनेअंतर्गत गोसावी बाबा मंदिर रस्ता कॉक्रीटीकरण 8 लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटन आणि दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आंबेडकर नगर येथे भूमिगत गटार कामासाठी 15 लाख रुपये, पशू वैद्यकीय दवाखाना इमारत 30 लाख रुपये, रमाई नगर येथे भूमिगत गटार करणे 5 लाख रुपये, जिल्हा परिषद सदस्य 15 व्या वित्त आयोग अंतर्गत दशक्रिया विधी पाणी टाकीसाठी 4 लाख रुपये , जिल्हा परिषद सदस्य 15 व्या वित्त आयोग अंतर्गत इंदिरा नगर येथे पाणी व्यवस्था 5 लाख रुपये, जनसुविधा अंतर्गत लिंगायत समाज स्मशानभूमी मध्ये निवारा शेड, बैठक व्यवस्था व रस्ता कॉक्रीटीकरण 15 लाख रुपये, आमदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत दशक्रिया विधी शेड 15 लाख रुपये या कामांचे भूमिपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

इतर बातम्याः

Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!

Nashik Trees | पर्यावरण मंत्र्यांच्या एका सूचनेमुळे 200 वर्षे पुरातन वटवृक्षासह 450 झाडे वाचणार, प्रकरण काय?

Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी