AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळ यांनी जय महाराष्ट्र करताच उद्धव ठाकरे काय म्हणाले?; राजकीय वर्तुळात चर्चा काय?

विधानसभेच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांच्या वगळणीनंतर त्यांच्या नाराजीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या शिवसेना किंवा राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांमध्ये उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची विधानभवनातील भेट ही चर्चेचा विषय ठरली आहे.

छगन भुजबळ यांनी जय महाराष्ट्र करताच उद्धव ठाकरे काय म्हणाले?; राजकीय वर्तुळात चर्चा काय?
Chhagan Bhujbal Uddhav ThackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 24, 2025 | 3:55 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा कायमच सुरु असते. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी शरद पवार गटात तर कधी शिवसेना ठाकरे गटात जाणार असल्याचे बोललं जातं. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. त्यातच आता उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची भेट झाली. या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे.

सध्या विधानभवनात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी अनेक मंत्री, विरोधक, सत्ताधारी हे सतत एकमेकांना भेटत असतात. त्यावेळी काहीना काही चर्चा होत असते. आताही ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची विधानभवनात भेट झाली. या भेटीनंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत उद्धव ठाकरे छगन भुजबळांना काय म्हणाले, यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरेंमधील संवाद काय?

या व्हिडीओत उद्धव ठाकरे विधानभवनाच्या लॉबीतून जाताना दिसत आहेत. त्याचवेळी समोरुन छगन भुजबळ येतात. उद्धव ठाकरेंना पाहताच छगन भुजबळ हे काही वेळ थांबले. त्यानंतर छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तुम्ही चुकीच्या जागेवर उभं राहून जय महाराष्ट्र बोलताय..बोला… जय महाराष्ट्र बोलणं गरजेच, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

छगन भुजबळ नेहमी संपर्कात

दरम्यान या आधी उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळांच्या “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना” या वाक्यावरही प्रतिक्रिया दिली होती. “या सरकारची झालीय दैना, त्यामुळे तिथे काही चैना, मैना, दैना काहीही होणार नाही. वहाँ नही रहैना हे मात्र त्यांचं अत्यंत योग्य आहे. छगन भुजबळ या विषयावर संपर्कात नाही. पण नेहमी संपर्कात असतात. सुधीर भाऊ मुनगंटीवार… बोलूया”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.