AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मराठी व्यक्तीने उद्योगात उतरायचे नाही का?’, हॉटेल प्रकरणात आरोप झाल्यानंतर संजय शिरसाट यांचा सवाल

छत्रपती संभाजीनगरातील हॉटेल विट्स लिलाव प्रक्रियेवर शिवसेना उबाठाकडून आक्षेप घेतले गेले. त्यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उत्तर दिले. मी सांगतो त्यावर विश्वास ठेऊ नका. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासकीय माहिती काढा.

'मराठी व्यक्तीने उद्योगात उतरायचे नाही का?', हॉटेल प्रकरणात आरोप झाल्यानंतर संजय शिरसाट यांचा सवाल
संजय शिरसाट
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 29, 2025 | 11:29 AM
Share

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरातील हॉटेल विट्स लिलाव प्रक्रियेतून घेतले. या हॉटेलची किंमत ११० कोटी होती, परंतु ते केवळ ६७ कोटी रुपयांत विकण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. या व्यवहारातून त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांना घेरले होते. त्याला गुरुवारी संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे. लिलाव प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर आहे. ज्यांची रात्रीची दारू उतरत नाही, ते असे बोलतात, असे संजय राऊत यांचे नाव न घेता शिरसाट यांनी म्हटले.

संजय शिरसाट म्हणाले, हॉटेलची संपूर्ण लिलाव प्रक्रिया कायदेशीर आहे. बोली लावताना डिपॉझिट भरावे लागते. ते भरल्यानंतर लिलाव प्रक्रियेत भाग घेतला. आता एका महिन्यात २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर बँकेची प्रक्रिया पार पाडत तीन महिन्यांत उर्वरित पैसे भरावे लागतील. मगच संपूर्ण व्यवहार पूर्ण होतील. या संपूर्ण लिलाव प्रक्रियेत सर्व व्यवहार कायदेशीर झाले आहे. परंतु दलालांनी बदनाम करण्याचे काम सुरु केले. रात्रीची ज्याची दारू उतरत नाही, ते असे बोलत असतात, असा टोला संजय शिरसाट यांनी नाव न घेता लगावला.

संजय शिससाट यांनी सांगितले की, मी सांगतो त्यावर विश्वास ठेऊ नका. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासकीय माहिती काढा. या हॉटेलच्या लिलावाची ही सातवी वेळ होती. मराठी व्यक्तीचे नाव घेताना लाज वाटत नाही का? मराठी माणसांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांचे पाय ओढले जात आहेत. त्यांचे मनपात जे दलाल होते, त्यात एकही मराठी व्यक्ती नव्हता. व्यक्तीने राजकारण करावे, पण इतक्या खालच्या स्तरावर राजकारण करु नये. या प्रकरणात कशी सूत्र फिरली, मला बदनाम करण्याचा कसा प्रयत्न झाला, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी योग्य वेळी देईल, असे त्यांनी म्हटले.

सन २०१२ च्या मूल्यांकन अहवालानुसार या हॉटेलची किंमत ११० कोटी रुपये होती. आता २०२५ मध्ये त्यात आणखी वाढ झाली असेल. मग ते केवळ ६७ कोटी रुपयांत कसे विकले, असा सवाल राऊत यांनी केला.

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर