“राजकारण, धर्म यांच्यात मिसळ केली तर देशाची प्रगती खुंटते”; काँग्रेस नेत्यानं बदलती राजकीय परिस्थिती सांगितली

उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळे काही उपद्यापही होणार नाही याची काळजीही सरकारने घेतली पाहिजे असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

राजकारण, धर्म यांच्यात मिसळ केली तर देशाची प्रगती खुंटते; काँग्रेस नेत्यानं बदलती  राजकीय परिस्थिती सांगितली
| Edited By: | Updated on: Mar 30, 2023 | 5:26 PM

संगमनेर /अहमदनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे आता आरोप प्रत्यारोपांचा फैरी झडत आहेत. संभाजीनगरमध्ये घडलेल्या प्रकारामुळे राजकीय वर्तुळासह सामाजिक वर्तुळातूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.या प्रकरणी अनेक जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ माजली आहे. औरंगाबादच्या राड्याप्रकरणी काँग्रेसकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर बोलताना काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, सध्याच्या परिस्थिती गंभीर असून ही स्थिती समाजासाठी घातक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केल आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून या परिस्थितीविषयी भीती व्यक्त केली जात आहे. धर्मावरून ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप केले जात आहे.

त्यामुळे सामाजिक परिस्थितीही बिघडत आहे. या सगळ्या गोष्टीचा सामाजिक परिस्थितीवरही परिणाम होत असून त्यामुळे सामाजिक प्रगतीवर त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे मतही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

बाळासाहेब थोरात यांनी धर्माविषयी बोलताना सांगितले की, धर्म हा ज्याचा त्याचा आहे त्यामुळे धर्माविषयी वाद निर्माण करून सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे पूर्णतः चुकीचे आहे.

राजकारण आणि धर्म यांच्यामध्ये मिसळ केली तर देशाची प्रगतीही खुंटते त्यामुळे या सगळ्या घटनांचा समाजावर विपरित परिणाम होतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

देश हा राज्यघटनेप्रमाणे चालतो दुर्दैवाने देशात जे चाललं आहे ते सर्वोच्च न्यायालयालाही पसंद पडत नाही त्यामुळे या सगळ्या प्रकाराविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली गेली आहे.

औरंगाबादमध्ये हा प्रकार घडलेला असतानाच दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेविषयी काँग्रेसला सवाल करण्यात आला आहे. कारण औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडीची सभा होत आहे. त्यामुळे ही सभा आता होणार की नाही असा सवालही उपस्थितीत केला जात आहे.

त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा यांची शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. सभा घेणं हा लोकशाहीचा अधिकार आहे.

त्याचबरोबरच उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळे काही उपद्यापही होणार नाही याची काळजीही सरकारने घेतली पाहिजे असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

संभाजीनगरमध्ये राडा झाला असला तरी महाविकास आघाडीची ही सभा होणारच आहे असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.