Khawadya Dongar : लेक, जावई आणि नातवाच्या निधनानंतर कुणालच्या आजोबांचा मोठा निर्णय

Kunal Changude : 19 वर्षीय कुणाल चांदगुडे याच्या एका हट्टामुळे संपूर्ण कुटुंबाचा अतं झाला आहे. कुणाल या खवड्या डोंगरावरुन उडी मारल्यानंतर, त्याच्या आई - वडिलांनी देखील त्याचं डोंगरावरुन उडी मारत स्वतःला संपलं आहे. अशात नातवाच्या निधनानंतर कुणाल याच्या आजोबांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Khawadya Dongar : लेक, जावई आणि नातवाच्या निधनानंतर कुणालच्या आजोबांचा मोठा निर्णय
| Updated on: Aug 23, 2026 | 11:10 AM

Kunal Changude : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. कुणार चांदगुडे याच्या आयफोनच्या हट्टाने संपूर्ण कुटुंबाची राखरांगोळी झाली आहे. घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून कुणाल याच्या कुटुंबातील वाद देखील चव्हाट्यावर आले आहेत. अशात कुणाल आणि त्याच्या आई वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यासोबत राहणाऱ्या कुत्र्याचं काय होणार? हाच प्रश्न सर्वांना पडलेला असताना. कुणाल याच्या आजोबांनी मोठा निर्णय घेतला आहे. कुणाल चांदगुडे आणि आई-वडिलांच्या मृत्यूनंतर घरातील पाळीव कुत्रा एकटाच पडला आहे. कुटुंबियांच्या मृत्यूनंतर घराच्या खिडकीतून श्वानाचा आर्त आरडाओरडा शेजारी राहणाऱ्यांनी चिंतेत टाकत आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा वर्षांपासून कुणाल कुत्र्याचा सांभाळ करत होता. अशात कुणालच्या मृत्यूनंतर त्याचा पाळीव कुत्रा पूर्णपणे एकटा पडला आहे. अखेर कुणाल याच्या वडिलांनी कुत्र्याला बिस्किटं खाऊ घातली आणि आता कुणालचे आजोबा बबनराव गाभुड करणार पाळीव कुत्र्याचा सांभाळ करणार आहेत.

सांगायचं झालं तर, एका क्षणात अख्खं कुटंब उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.  कुणाल याची आई युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करत ननंदेवर सतत आरोप करायची. तिचे व्हिडीओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे. तीन जणांचं कुटुंंब असलं तरी, कुटुंबात वाद खूप होते.

कुणाल याच्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर, ते ट्रक ड्रायव्हर होते. ते फार घरी नसायचे. आता आता देखील कुणाल याचे वडील तीन महिन्यांनंतर घरी आले होते. पण वडील घरी आल्यानंतर पुन्हा खटके उडू लागले. शेवटच्या क्षणी कुणाल याची आई असं देखील म्हणत होती की, मी तुझ्या वडिलांना सोडून, तू उडी मारु नकोस.. पण अखेर होत्याचं  नव्हत झालंच.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून घरात भांडणं सुरुच होती.  कुणाल याच्याकडे आयफोन होता. पण त्याला अपडेटेट आयफोन हवा होता. पण जुन्या मोबाईलचेच हप्ते  फेडायचे बाकी होते. याच कारणामुळे कुटुंबात वाद सुरु होते. अखेर खवड्या डोंगरावर हे वाद विकोपास गेले आणि संपूर्ण कुटुंबाचा अंत झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us